छत्रपती संभाजीनगर दि.३०: छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.प्रमोद दुथडे फाऊंडेशनव मानव उद्धार परिवर्तन ज्ञानसाधना संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारनांदेडचे भूमिपुत्र व य मॅक्स महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचे मराठवाडा ब्युरो धनंजय प्रल्हादराव सोळंके यांना शांतीदुत जीवन गौरव पुरस्कार-2024 जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळ्याचा कार्यक्रम दि.2 जून रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे डॉ.प्रमोद दुथडे फाऊंडेशन प्रत्येक वर्षी शांतीदुत जीवन पुरस्कार प्रदान करत असते. त्यामध्ये कार्यकारी अभियंता एस.एस.भगत, सुनिल वाकेकर, प्रादेशिक व्यवस्थापक वसंतराव नाईक महामंडळ दत्ता सागळे, मोहनदादा मस्के, पार्वतीबाई मोतीराम दुथडे, सुभद्रबाई संपतराव साबळे, शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे यांना आप-आपल्या क्षेत्रातील कामगिरीसाठी हा जीवन गौरव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. नांदेड येथील पत्रकार तथा मॅक्स महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचे मराठवाडा ब्युरो धनंजय सोळंके यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून सामाजिक, संस्कृतीक, राजकीय, शेती, शेतमजुर, उपेक्षीत, दिनदुबळ्या घटकांना बातम्यांच्या माध्यमातून दखल घेवून त्यांना न्याय मिळून दिल्याबद्दल हा पुरस्कार धनंजय सोळंके यांना मिळाला आहे.
दि.2 जून रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या गेटसमोर डॉ.प्रमोद दुथडे फाऊंडेशन आणि मानवउध्दार परिवर्तन ज्ञान साधना यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये बुध्द आणि भिम गितांचा महामुकाबला होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकारी अभियंता अशोक येरेकर हे आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष पार्वती हॉस्पीटल छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.प्रमोददादा दुथडे आहेत. या कार्यक्रमात शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, आरोग्य उपसंचालक डॉ.भूषणकुमार रामटेके, मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वैशाली चव्हाण आणि डॉ.सुरेश हरबडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 2 जून रोजी हा धम्म पहाट कार्यक्रम सकाळी 7 ते 12 या वेळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटसमोर होणार आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड