नांदेड दि.८: मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड आदेशाने रेकॉर्ड वरील, पाहिजे, फरारी आरोपीतांचा शोध घेवुन अवैध धंद्यावर कार्यवाही करणे व संशईत हालचालीवर लक्ष ठेवणे करीता आदेशीत केल्याप्रमाणे श्री सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा यांच्या मार्गदर्शन व सुचनेवरुन उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकाँ/ चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, यांनी आज दिनांक 07/05/2024 रोजी रात्री 12.45 वाजताच्या सुमारास लुटे मामा चौक, लुटे मामा पाटी जवळ येथे मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन छापा टाकून आरोपी नामे हरीश ऊर्फ ह-या देविदास शर्मा वय 23 वर्ष व्यवसाय बेकार रा. गोवर्धन घाट ब्रिज खाली नांदेड यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातील विनापरवाना बेकायदेशीर बाळगलेले 01 गावठी पिस्टल व 03 जिवंत काडतुस मिळुन आल्याने ते जप्त केले आहेत. यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गुन्हा नोंद क्रमांक 357/2024 कलम 3/25, शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोउपनि श्री महेश गायकवाड करीत आहेत. तसेच त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केले असता त्याने सांगितले की मागिल सात ते आठ महिन्यापुर्वी मंत्रीनगर जागृत हनुमान मंदिरं जवळ चैन स्नॅचिंग केले असल्याची सांगितले यावरुन पोलस स्टेशन भाग्यनगर अभिलखावर माहिती काढले असता पोलीस स्टेशन भाग्यनगर गुरन 306/2024 कलम 392,34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे तसेच सदर आरोपी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण गुरन 562/2023 कलम 379,34 भादवि, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण 812/2023 कलम 395,34 भादवि, मध्ये पाहिजे असल्याचे निष्पन झाले.
सदर कार्यवाही बाबत मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड व ईतर वरिष्ठांनी गुन्हे शोध पथक उपविभाग इतवारा यांचे कौतुक केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड