हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- वन विभागाच्या हिमायतनगर वनपरिक्षेत्र अंतर्गत तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील माळरानावर 42 डिग्री तापमानातही डोलत आहेत हिरवीगार रोपे ही रोपे पाहण्यासाठी परिसरासह तालुक्यातील नागरिक व अधिकारी घेत आहेत ह्या माळरानाची भेट….
तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे वनीकरण वाढीच्या योजने अंतर्गत 2023 च्या पावसाळ्यात वीस हेक्टर क्षेत्रात, 32 हजार रोपे लावण्यात आली होते त्या वृक्ष लागवडी मध्ये साग, कडुलिंब, जांभूळ, बांबू , वड, पिंपळ, सिताफळ या प्रजातींचे रोपे हिमायतनगर वनविभागाच्या वनपरिक्षेत्रांतर्गत लावण्यात आली होती ऑक्टोंबर महिन्यात पाऊस थांबल्यानंतर डिसेंबर मध्ये येथील खडकाळ जमीन असल्याने ती रोपे सुकत असल्याचे दिसून आल्यावर नांदेड वनविभागाचे उपवनसंरक्षक मा. केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक भीमसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी चव्हाण यांच्या आदेशानुसार हिमायतनगर येथील वन परिमंडळ अधिकारी अमोल कदम यांनी येथील वनमजूर शेख अहमद, प्रकाश मेंडके ,नामदेव परमिटवार यांच्या मदतीने लागूनच असलेल्या पैनगंगा नदीचे पाणी तेथील शेतकरी व ग्रामस्थांच्या मदतीने मोटार पंपाच्या सहाय्याने श्रमदानातून सर्व रोपांना जीवनदान देण्यासाठी जानेवारी 2024 ते आज पर्यंत पाणी दिल्याने येथील सर्व रोपांची चांगली वाढ होऊन हिमायतनगर तालुक्यात 42 डिग्री तापमानातही ही रोपे हिरवीगार दिसत आहेत त्यामुळे येथील वनविभाग कर्मचाऱ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचा तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी कौतुक केले आहे या ठिकाणी पूर्वीचे फोटो येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे उपलब्ध आहेत त्या फोटोमध्ये या ठिकाणी एकही झाड सदर माळरानावर दिसत नव्हते पण एका वर्षातच हजारो झाडांनी मंगरूळ येथील माळरान हिरविगार नटलेले नयनरम्य चित्र पाहण्यासाठी अनेक नागरिक व अधिकारी दूर दूरवरून येथे येत आहेत यापुढेही अशीच मेहनत घेऊन येथील माळरानास चांगल्या प्रतीचे जंगलबनविण्यासाठी मेहनत घेणार असल्याचे अमोल कदम यांनी सांगितले