नांदेड दि.२६: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांतील 88 लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 8 जागांसाठी आणि बिहारमधील 5 जागांसाठी मतदान पार पडत आहे. राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी(ता. 26) रोजी मतदान होत आहे. मतदारांचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे.
याचदरम्यान, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडमध्ये एका युवकाने कुऱ्हाडीने चक्क ईव्हीएम (EVM) मशीन फोडल्याची धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात मतदान सुरू आहे. त्यात नांदेडचा देखील समावेश आहे. पण या जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. बिलोली तालुक्यातील रामतीर्थ गावात एका युवकाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना समोर आली आहे . यानंतर पोलिसांनी तत्काळ या संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. पण घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच मतदान केंद्रावरील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.
लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री राज्यसभेतील भाजपचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत भाजपने जिंकला तेव्हा अशोक चव्हाण हेच काँग्रेसकडून उमेदवार होते. परंतु गेल्या पाच वर्षांत घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे तेच चव्हाण आज भाजपचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्यासाठी मतं मागताना दिसत आहेत.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड