मुदखेड ता प्र दि.६: मुदखेड पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी येणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, व मुस्लिम धर्मियांचे पवित्र रमजान ईद, रामनवमी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सण उत्सवाच्या निमित्ताने मुदखेड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आज दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळी १२ वाजता घेण्यात आली.या बैठकीला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलताई शिंदे हे उपस्थित होते
पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी आपल्या मनोगतातून तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुदखेड वासीयांनी प्रयत्न करावे. व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर या सारख्या सोशल मीडिया द्वारे जातीय तेढ निर्माण होणार नाही अशी कोणतीही पोस्ट करू नये. महाराष्ट्र हा आपल्या संतांची भूमी आहे त्यामुळे कोणताही चुकीचा प्रकार घडणार नाही याची काळजी आपण शहर वासीयांनी घेतली पाहिजे असे पोलिस निरिक्षक वसंत सप्रे यांनी शांतता कमिटी बैठकीत बोलताना म्हणाले.
यावेळी माजी नगरसेवक तथा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कैलास गोडसे, माजी नगरसेवक शंकर राठी,माजी नगरसेवक करीम खां साहब, शहराध्यक्ष शिवसेना अंकुश मामीडवार,संपादक अजगर हुसेन साब,शेख अहेमद सौदागर,बाबूभाई कपडेवाले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महमद बुऱ्हाण,एमआयएम शहराध्यक्ष महमद हुसेन,मुजीब पठाण, डिएसबी चे किशोर पाटील,
या बैठकीला मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सिध्दार्थ चौदंते,संजय कोलते,संतोष गाढे, साहेबराव गागलवाड,
नामदेव राहेरे, साहेबराव हौसरे,अतिक अहेमद,धम्मा कांबळे,
अब्दुल रज्जाक,अमोल टेकले,शेख शेमशोदीन, हाफिज कुरेशी, महंमद हाकिम व सर्वच समाजांतील बांधवांनी उपस्थिती लावली होती
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलताई शिंदे यांनी मानले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड