८७-नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे प्रशिक्षण
नांदेड दि. ३० :प्रत्येक मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी ‘चुनाव का पर्व, देश का गर्व ‘या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील येवू घातलेल्या समस्या कोणत्या आहेत याचाही प्रशिक्षण घेताना विचार करून आलेल्या समस्यांचे निराकरण प्रशिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केल्यास मतदान घेणे अधिक सोईचे व सोपे होते, असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम प्रशिक्षणात ते बोलत होते.
प्रशिक्षणाच्या सुरुवातीस अभिजित राऊत यांचे विकास माने, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी स्वागत केले व प्रशिक्षणाचे प्रास्ताविक नितेशकुमार बोलोलू, प्रशिक्षण प्रमूख तथा नायब तहसिलदार निवडणूक तहसिल कार्यालय नांदेड यांनी केले. यावेळी प्रशिक्षण मंचावर ललितकुमार व-हाडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 86 नांदेड उत्तर विधानसभा संघ तथा उपजिल्हाधिकारी रोहयो, तहसिलदार उमाजी बोथीकर, मनपा शिक्षणाधिकारी आर.आर. पातळे, नायब तहसिलदार स्विप्नील दिगलवार उपस्थित होते.
श्री गुरूग्रंथ साहीब भवन येथे दोन सत्रात हे प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या सत्रात विकास माने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी विस्तृतपणे सादरीकरणाच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया सुरु करण्यापासून समाप्त होण्यापर्यंतचे प्रशिक्षण दिले. यामध्ये ई.व्ही.एम.,व्ही.व्ही.पॅट यासंबंधी अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली. विविध अर्ज कसे भरतात, कोण-कोणत्या समस्या येवू शकतात व त्या समस्यांचे उपाय कोणते याबद्दल सूध्दा प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाच्या दुस-या टप्पयात ई.व्ही.एम. व व्ही.व्ही,. पॅटचे प्रत्यक्ष हाताळणी बाबतचे प्रशिक्षण देण्यांत आले. यामध्ये ई.व्ही.एम. ची जोडणी कशी केली जाते याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. सर्व क्षेत्रिय अधिकारी, मतदान अधिकारी, कर्मचारी, मास्टर ट्रेनर, मंडळ अधिकारी अश्या विविध अधिकारी व कर्मचारी यांना पी.पी.टी. व्दारे निवडणूक कार्यप्रणाली व मतदान केंद्रावरील कर्तव्य, विविध फॉर्म, विविध प्रपत्रे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. ई.व्ही.एम. यंत्रात तांत्रिक दोष आढळल्यास त्याचे निराकरण कसे करावे हे चर्चेव्दारे शंका निरसन करण्यात आले. याच प्रशिक्षणात टपाली ई.डी.सि. मतपत्रिका बाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक कर्तव्यावर राहून सूध्दा मतदान करता येईल ही जाणीव करून देण्यात आली. या प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालन राजेश कूलकर्णी यांनी केले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी राजकूमार कोटूरवार, बालाजी जाधव, संजय भालके, आर.जी. कुलकर्णी, बाबूराव जाधव, शेख जमील व महमद आखीब तथा निवडणूक विभाग तहसिल कार्यालय नांदेड येथील सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड