नांदेड दि.२७:हिंगोली लोकसभेची महाविकास आघाडी कडून माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर होताच हिमायतनगर शहरातील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना, काँग्रेस ,राष्ट्रवादी सह मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्री परमेश्वर मंदिर समोर आज फटाके फोडून आनंद साजरा केला व एक मेकांना पेढे भरवत नागेश पाटील आष्टीकर साहेबाना महाराष्ट्रात सर्वात जास्त मताने निवडून देऊ असा यावेळी संकल्प केला यावेळी माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड,काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान,शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, चेअरमन प्रवीण शिंदे, शहर प्रमुख प्रकाश रामदीनवार ,राम नरवाडे , जुनेद भाई,युवा सेना शहर प्रमुख अमोल धुमाळे ,मंगेश धुमाळे सह असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
ADVERTISEMENT