नांदेड, दि. २२ :मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व नांदेड महानगर व नांदेड ग्रामीण मध्ये मोठ्या संख्येने मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी कार्यरत असणारी निवडणूक काळातील स्वीप यंत्रणेचे प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात नवमतदार व महिला मतदारांची संख्या वाढविण्यावर निवडणूक विभागाच्यावतीने भर दिला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नवमतदाराची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यात स्वीप कक्षाची स्थापना करुन विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन मतदारामध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
मतदार व मतदान वाढविण्यासाठी निवडणूक विभागाच्यावतीने जिल्हास्तरावर स्वीप कक्षाची स्थापना केली आहे. या स्वीप कक्षासाठी आता दोन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत निर्गमित केले आहेत.
स्वीप कक्षात ग्रामीण क्षेत्रासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल, नांदेड जिल्हा नागरी क्षेत्रासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त, महेशकुमार डोईफोडे यांची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यात महानगर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्वीप उपक्रमांतर्गत निवडणुकीतील मतदान वाढविण्यासाठी प्रचार प्रसार करण्यात येत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड