नांदेड दि.२२: मुदखेड शहरातील गुजरी मोहल्ला (भीम नगर) येथील रहिवासी अब्दुल गनी मदारसाब (किराणा वाले) यांचे दि.२२ मार्च २०२४ रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय ६५ वर्षे होत.
विशेष म्हणजे अब्दुल गनी मदारसाब हे शहरातील जामा मस्जिद चे सेक्रेटरी मोहम्मद अकबर यांचे वडील होतं, इस्लामच्या पवित्र रमझान महिन्यामध्ये जो कोणी मुस्लिम व्यक्तीचा मृत्यू होतो त्यास प्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारचा हिशोब न होता थेट स्वर्ग प्राप्ती होण्याची संकल्पना इस्लामच्या धार्मिक शास्त्रात उल्लेख असल्याचे सांगण्यात येते
त्यांच्या पश्चात पाच मुलं दोन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी दि.22 मार्च 2024 शुक्रवार रोजी दुपारी 02.10 वाजता मुदखेड शहरातील कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी त्यांच्या अंत्यविधीसाठी मोठया संख्येत स्थानिक नागरिकांची गर्दी होती.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड