नांदेड दि.१८: ठिकाणी भाषण देणे यावर निर्बंध घालण्यात आले आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी निर्गमित झाल्यापासून 6 जून 2024 पर्यत अंमलात राहील.
मालमत्तेची विरुपता नको
शासकीय, निमशासकीय,सार्वजनिक मालमत्तेची विरुपता करण्यास निर्बंध निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विरुपता करण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी आदेश निर्गमित झाल्यापासून 6 जून 2024 पर्यत अंमलात राहील.
शस्त्रास्त्रे वाहण्यास बंदी
शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर व शस्त्र बाळगण्यास बंदी
निवडणूकीचे कालावधीत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी व महाराष्ट्र शासन गृह विभाग यांचे दिनांक 20 सप्टेंबर 2014 च्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यातील छाननी समितीने वगळलेल्या शस्त्र परवानाधारके व्यतिरिक्त इतर सर्व परवाना धारकास परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास व शस्त्र बाळगण्यास या आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी आदेश निर्गमित झाल्यापासून 6 जून 2024 पर्यत अंमलात राहतील.
नामनिर्देशनपत्र दाखल करताना अवलंब करावयाची कार्यपद्धत
निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या परिसरात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/ वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंधीत करण्यात आले आहे.
तसेच वाहनाच्या ताफ्यामध्ये 3 पेक्षा जास्त वाहने निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात आणण्यास, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी पाच व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी आदेश निर्गमित झाल्यापासून 6 जून 2024 पर्यत अंमलात राहील.
मतदान केंद्र परिसरात 144 कलम
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 प्रक्रियेदरम्यान, नांदेड जिल्ह्यात ज्याठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे यांचा वापर करण्यास, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतीरीक्त व्यक्तीस प्रवेश करण्याकरीता 26 एप्रिल 2024 रोजी प्रतिबंधीत करण्यात आले आहे. हा आदेश मतदानाच्या दिवशी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यन्त अंमलात राहील
#सत्यप्रभा न्युज #नांदेड