नांदेड दि१५ : अशोक चव्हाण यांच्या सोबत काही महत्वाचे लोक भाजपात गेले असले तरी जनता मात्र आजही आमच्या साेबत आहे. नांदेड काँग्रेस आजही मजबूत असल्याचे नांदेड जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम यांनी नमूद केले. कदम यांच्या निवडीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत नांदेडची काॅंग्रेस भक्कम असल्याचे नमूद केले.
काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. यामुळे नांदेड जिल्ह्याची काँग्रेसची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. आगामी काळातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नांदेड जिल्हा कार्यकारिणी नियुक्तीसाठी हालचाली केल्या.
काँग्रेसने जेष्ठ नेते नेते बी.आर. कदम यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. कदम यांनी जिल्हाध्यक्षपदाची धूरा हातात घेताच लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचाच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
ते म्हणाले अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाने काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यात नुकसान होणार नाही. काही महत्वाचे लोक अशोक चव्हाण यांच्या सोबत भाजपात गेले आहेत. परंतु नांदेडची जनता मात्र आजही काँग्रेस पक्षा सोबत आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांमध्ये काॅंग्रेसचे उमेदवारच विजयी हाेणार असेही कदम यांनी स्पष्ट केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड