नांदेड दि.१३: जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलींचे शासकीय वसतिगृह येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये सद्यस्थितीत देशातील महिलांमध्ये आढळणारा सर्वायकल कॅन्सर (गर्भाशयाचा कर्करोग)हयाचे प्रमाण वाढत असून दरवर्षी सुमारे 1.25 लक्ष प्रकरणे आणि सुमारे 75 हजार मृत्युची नोंद होत आहे ही फार धक्कादायक बाब आहे. या विषयी महिलांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने विश्वअंकुर सेवाभावी संस्था नांदेड अंतर्गत आरोग्य शिबिर राबविण्यात आले या वेळी संस्थेच्या अध्यक्षा तसेच मनसे च्या महिला जिल्हा अध्यक्षा सौ. उषाताई नरवाडे,कार्यक्रमांचे अध्यक्ष सौ.रवीता आडे (गृहपाल) प्रमुख मार्गदर्शक डॉ.सौ.सुचिता ऐकमवार (स्त्रिरोग तज्ञ) गंगा हॉस्पीटल प्रमुख उपस्थिति सौ.मयुरी मिनगिरे कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ अंजली नरवाडे (चव्हाण) यांनी केले, उपस्थित बालरोगतज्ज्ञ सौ.सिमा मॅडम, सौ सुचिता पेकमवार,सौ ममता गंगातीर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैभावी केसमोडे यांनी केले व आभार प्रदर्शन वैष्णवी चौरे यांनी केले यावेळी अनेक विद्यार्थांनीची उपस्थिति होती.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड