नांदेड दि.६: आज दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी सहयोग सेवाभावी संस्थेचे, इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, सहयोग कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड येथे निवडणूक साक्षरता अभियान अंतर्गत, जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभाग यांचेकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे मतदान जनजागृती प्रात्यक्षिक (EVM) संदर्भात माहिती मिळावी यासाठी उद्बोधन शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना निवडणुकीचे महत्त्व पटवून देण्यात आले व निवडणुकीतील युवकांचे योगदान याविषयी मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने मतदानामध्ये सहभागी होऊन देशाच्या विकासासाठी कसा हातभार लावता येईल याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले, विद्यार्थ्यांना ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक दाखवून प्रत्यक्षात कशा पद्धतीने मतदान होत असते व त्याची गणना कशा पद्धतीने होते याची माहिती देण्यात आली, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना काही चित्रफिती दाखवण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व निवडणूक साक्षरता मंडळ यांनी महत्त्वाची भूमिका पार पडली. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये मास्टर ट्रेनर श्री. व्ही. टी. सोनाळे, निवडणूक शाखा तसेच या कार्यक्रमा साठी संस्थेचे सचिव आदरणीय डॉ. संतुक हंबर्डे, प्राचार्य श्री विश्वनाथ भरकड, प्राचार्य डॉ. बालाजी गिरगावकर, डॉ. एस बी जाधव, श्री मोहम्मद जमीरुद्दीन, डॉ प्रवीण कारले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रवीण मुळी, श्री राज कदम, श्री मंगेश पतंगे, तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड