नांदेड दि.३: शहरात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिक पडले घराबाहेर वाघाळा शहर महापालिकेच्या हद्दीत असलेल्या अनेक परिसरात 3 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजून18 मिनटाच्या दरम्यांन भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.यावेळी घरे हादरल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले होते.धक्के सौम्य असल्याने कोणत्याही प्रकारची हाणी झाली नसून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डेटावरील आधारित प्राथमिक अहवालानुसार 1.5 रिश्टर ची तीव्रता असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या हद्दीतील विवेकनगर, श्रीनगर, कैलासनगर, आयटीआय परिसर,शिवाजीनगर,पोलिस कॉलनी आदी भागात एक मोठा आवाज झाला.या आवाजासह सोम्य धक्के जाणवल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले होते. दरम्यान यापूर्वीही शहरात अशा प्रकारचे धक्के जाणवले होते.यावेळी सायन्स कॉलेज परिसर केंद्र बिंदू असल्याची माहिती प्राप्त झाली होती. याबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डेटावर उपलब्ध माहितीनुसार सदर धक्क्याची नोंद 1.5 रिश्टर एवढी असल्याची सांगण्यात आली आहे.यामुळे सदरिल धक्के हे सौम्य प्रकारचे असल्यामळे नागरिकांनी भयभीत होवून नये असे आवाहन जिल्हाप्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड