हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तत्कालीन तालुका अध्यक्ष प्रकाश सावळे यांचे दुःखद निधन झाल्यानंतर हिमायतनगर येथील चर्मकार बांधवांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी येथील चर्मकार महासंघाची कार्यकारणी प्रलंबित होती ती कार्यकारणी आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष माधव गायकवाड व नांदेड जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड यांच्या उपस्थितीत हिमायतनगर येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी दशरथ प्रकाश सावळे यांना नांदेड येथील कार्यक्रमात नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला..
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तत्कालीन तालुका अध्यक्ष प्रकाश सावळे यांचे चिरंजीव दशरथ प्रकाश सावळे यांची आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून हिमायतनगर येथील चर्मकार बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांच्या वडिलांची कारकीर्द लक्षात घेऊन दशरथ सावळे यांना हिमायतनगर चर्मकार महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी दशरथ प्रकाश सावळे यांची निवड करून त्यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष माधव गायकवाड ,नांदेड जिल्हा अध्यक्ष गजानन जोगदंड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले त्यांबरोबर हिमायतनगर तालुका उपाध्यक्ष बालाजी डोंगरे ,सचिव पदी श्रीराम वासुदेव ,अंकुश इटकरे, शहर प्रमुख हनुमान वासुदेव, तालुका उपाध्यक्ष ग्रामीण प्रमुख आशिष तवरे ,तालुका संघटक मल्लेश सोनटक्के, तालुका प्रसिद्धीप्रमुख म्हणून ह्यांच्या सुद्धा निवडीकरण्यात आल्या त्याबद्दल हिमायतनगर येथील पत्रकार बांधव व चर्मकार बांधवांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत…