👉🏻 हिमायतनगर शहरातील शिव नागनाथ मंदिराच्या फलक अनावरण प्रसंगी व्यक्त केल्या भावना..
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-शहरातील रेल्वेस्टेशन परिसरातील शिवनागनाथ मंदीराला स्व. राजीव सातव यांनी 2017 मध्ये 4 लाख 49 हजार निधी दिला होता त्या निधीच्या फलकाचे भूमिपूजन महाविकास आघाडी कडून हिंगोली लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या आ. प्रज्ञाताई सातव यांनी दि 28 जानेवारी रोजी शहरातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आले असताना केल्या…
याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू झाली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्याच धर्तीवर महाविकास आघाडी कडून हिंगोली लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे स्व. राजीवभाऊ सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञाताई सातव यांनी सुद्धा हिंगोली लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली असल्याचे त्यांनी दिनांक 28 जानेवारी रोजी हिमायतनगर शहरातील कार्यकर्ता भेटीगाठी दरम्यान बोलून दाखविले यावेळी त्यांनी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात मागील काळात खा.राजीवभाऊ सातव यांनी शिव नागनाथ मंदिराच्या सभागृहासाठी पाच लाख रुपयांचा निधी दिला होता त्या फलकाचे अनावरण ते करू शकले नाही म्हणून त्यांच्या पत्नी आमदार प्रज्ञाताई सातव यांनी आज येथील शिव मंदिराचे दर्शन घेऊन तेथील फलकाचे अनावरण केले व नंतर शहरातील माजी जिल्हा परिषद सदस्य समद खाॅन व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान पठाण यांच्या निवास स्थानाला भेट दिली व नंतर शहरातील आंबेडकर चौकातील बौद्ध विहारास भेट देऊन तेथील गौतम बुद्धाच्या प्रतिमेसमोर अभिवादन करून शुभ आशीर्वाद घेतले तेव्हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी त्यांना पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी आमदार प्रज्ञाताई सातव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना बोलताना असे सांगितले की आगामी होणाऱ्या लोक हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठींनी व महाविकास आघाडी कडून मला संधी दिल्यास नक्कीच मी स्वर्गीय राजूभाऊ सातव यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हिंगोली लोकसभेमध्ये प्रयत्न करेल असे सांगून त्यांनी हिंगोली लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी दाखवत तालुक्यातील मौजे पवना, आंदेगाव, टेंभी, खडकी या गावांचा दौरा करुन तेथील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेवून त्यांच्या अडचणी जाणून घेत चहापाणी घेतला तेव्हा या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे आ. प्रज्ञाताई सातव ह्या महाविकास आघाडीकडून हिंगोली लोकसभेसाठी उत्सूक आहेत हे मात्र स्पष्ट झाले आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी कडून शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, काँग्रेस पक्षाकडून अंकुश देवसरकर व स्व. राजूभाऊ सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञाताई सातव या सुद्धा हिंगोली लोकसभेची उमेदवारी मागण्यासाठी रिंगणात इच्छुक असल्यामुळे महाविकास आघाडी कडून कोणाची वर्णी लागेल याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे
यावेळी त्यांच्या सोबत हिगोंलीहून गुंजकर ताई, पतंगे, लोखंडे, सह हिमायतनगर शहरातील माजी नगरसेवक प्रभाकर मुधोळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य समदखाॅन पठाण, माजी नगरसेविका सुरेखाताई सदाशिव सातव, अनवर खान पठाण, दिलीप राठोड, आनंद मुतनेपाड, पवन काईतवाड, राजू चिकनेपवाड, गणेश अक्कलवाड, सावन रावते,श्यामभाऊ ढगे सह आदी जन उपस्थित होते