👉🏻हदगाव हिमायतनगर विधासभा कार्यक्षेत्रातील जन सामान्याचा नेता….
हिमायतनगर ( वाढदिवस विशेष लेख )/-जनसामान्य नागरिकांशी नेहमी नाळ जोडून राहणारा कृतिशील विकासाभिमुख लोकनेता म्हणून आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना ओळखले जाते २६ जानेवारी हा आमदार माधवराव पाटील यांचा वाढदिवस लोक कल्याणकारी सामान्याचा कृतीशील विकासाभिमुख नेता आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे बाल पणा पासूनच युवक, शेतकरी, शेतमजूर वृद्ध, निराधार, व्यापारी, कर्मचारी, यांचे लाडके नेते म्हणून दोन्ही तालुक्यात सुपरिचित आहेत.
हदगाव हिमायतनगर तालुक्यात माणसे जातीपेक्षा कर्तव्याने श्रेष्ठ बनतात हे आपल्या कार्य कुशलतेने जवळगावकरांनी दाखवून दिले आहे. माजी मुख्यमंत्री तथा महाविकास आघाडीतील माजी सार्वजनिक बांधकाम माजी मंत्री अशोकराव चव्हाण यांचे एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून आमदार माधवराव पाटील जळगावकर यांना ओळखले जाते. त्यांचे संघटन कौशल्य व निडरपणा, विनम्रपणा, हसतमुख, सात्विक चेहरा सर्वांना आपलासा वाटतो. त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक माणूस कधीच त्यांच्या पासून दूर गेला नाही. १५ ते २० वर्षांचा विकासाचा अनुशेष त्यांनी पूर्वीच्या आमदारकीच्या काळात तब्बल ३५ कोटींची विकास कामे करून हदगाव हिमायतनगर तालुक्याला न्याय दिला. जनतेच्या सुख दुःखात अडचणीच्या काळात साथ दिल्यामुळे ते जनतेला आपलेसे वाटतात. जनतेचे प्रेम व विश्वास संपादन केल्याने ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. मागील पाच वर्षाच्या काळात पराभवाने खचून न जाता दिवस रात्र जनतेचे कामे आई शांताबाई निवृत्तीराव पवार यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना हदगाव हिमायतनगर तालुक्याला भरमसाठ निधी खेचून आणला. एक एक कार्यकर्ता जोडत शहर, गाव, वाडी, तांड्यावरील जनतेच्या अडचणी त्यांनी सोडविल्या जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी झाल्याने आमचा नेता म्हणून जनता त्यांना चाहते. हिमायतनगर तालुक्यात त्यांच्यामुळे बहुतांश ग्रामपंचायत व सेवा सहकारी सोसायटी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत
कै. माजी आमदार निवृत्तीराव पाटील जवळगावकर व केंद्रीय माजी गृह मंत्री शंकरराव चव्हाण यांचे ते विश्वासू व एकनिष्ठ निष्ठावान होते. तेवढेच एकनिष्ठ व काँग्रेस पक्षाचे आमदार पाटील जवळगावकर हे माजी मुख्यमंत्री तथा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचे ते विश्वास, निष्ठावंत कार्यकर्त आहेत, म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष पद त्यांच्या मातोश्री शांताबाई निवृत्तीराव पवार यांनी अडीच वर्षे भूषविले, त्यामुळे हदगाव, हिमायतनगर तालुक्याला न्याय मिळाला. सामान्य माणसा पासून ते शेतकरी शेतमजूर, युवक, व्यापारी, वृद्ध कर्मचारी, यांच्याशी संवाद साधणारा नेता म्हणून त्यांच्या कार्यशैलीकडे जनता पाहते. खेड्यापाड्यात, वाडी तांड्यावर आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी मागील व आताच्या अडीच तीन वर्षाच्या काळात अनेक विकासात्मक काम केली आहेत. शिक्षण व सिंचन सुविधांसाठी ते आग्रही आहेत. हदगाव हिमायतनगर तालुक्यात जळालेल्या डीपी पाठपुरवठा करून शेतकऱ्यांना विद्युत सेवा पूर्ववत करून दिली. अनेक गावात हदगाव व हिमायतनगर शहरात समाज मंदिर शादी खाना, बौद्ध विहार, सिमेंट रोड, पाणीपुरवठा विहीर, पाण्याचे टाकी, वॉल कंपाउंड, बोरवेल, सभागृह, डांबरी रस्ते, प्रशासकी इमारती, आदिवासी वस्तीगृह दलित वस्ती, तांडा वस्ती, आदीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. दारिद्र रेषे खालील लोकांची कामे वेळेवर केलीत, वीज, आरोग्य, शिक्षण, रस्ते असे अनेक प्रश्न जवळगावकर यांनी मतदारसंघात सोडवले आहेत त्याच बरोबर त्याच्या निष्ठावंत कार्यकर्त्यान मध्ये ते “बॉस ” ह्या नांवाने परिचित आहेत अशा कार्यसम्राट लोकनेत्यास दीघार्युष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
व्रत संकलन:- नागेश परमेश्वर शिंदे, हिमायतनगर