नांदेड – नांदेड शहर प्लास्टीक मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेच्या विशेष पथकाने आज दि.१८/०१/२०२४ (गुरुवार) रोजी क्षेत्रिय कार्यालय क्र. ०३ (शिवाजीनगर) अंतर्गत महात्मा फुले मार्केट समोरील नांदेड वाईन मार्ट या दुकानाची तपासणी केली असता, शासनाने बंदी घातलेला प्लॉस्टीक व सिंगल युज प्लॉस्टिक कॅरीबॅग्जचा वापर केल्याच्या कारणास्तव संबंधित दुकान धारकास रु.१०,०००/- (अक्षरी दहा हजार रुपये फक्त) दंड वसूल करुन सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तरी यापूढे शहरात प्लास्टिक किंवा सिंगल युज प्लास्टिकचे आयात, निर्यात, विक्री, साठवणूक, वाहतूक व वापर करणा-या व्यवसाय धारकांविरुध्द कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे.
सदरची कार्यवाही मा.आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, मा. अतिरिक्त आयुक्त श्री गिरीष कदम यांच्या आदेशानुसार उपायुक्त श्री निलेश सुंकेवार आणि सहाय्यक आयुक्त श्री गुलाम मो.सादेक यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रिय अधिकारी श्री रमेश चावरे, स्वच्छता निरिक्षक श्री राजेंद्र गंदमवार, श्री किशन तारु, श्री शेख नईम व ईतर कर्मचारी हजर होते.
शहरात शासनाने बंदी घातलेल्या प्लॉस्टिक व सिंगल युज प्लॉस्टिक कॅरीबॅग्जचे आयात, निर्यात, साठा, विक्री, वाहतूक व वापर करण्यात येऊ नये तसेच शहरातील प्लास्टिक मुळे होणारे प्रदूषण टाळन्यासाठी महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने सर्व व्यवसाय धारकास करण्यात येत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड