नांदेड-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड अंतर्गत विशेष कर वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच ३१ जानेवारी २०२४ पर्यंत ४० टक्के शास्ती माफी योजना लागू आहे. त्यानुसार जास्तीत जास्त मालमत्ता धारकांकडुन कर संकलन करुन वसुलीचे उद्दीष्टे १०۰ टक्के पुर्ण करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी दिलेले आहेत. त्यानुसार उपायुक्त (महसुल) डॉ.पंजाब खानसोळे यांनी सर्व क्षेत्रिय कार्यालयांना थकबाकीदार यांच्याकडुन कर वसुली करावी व कर भरण्यास नकार दिल्यास जप्तीची कार्यवाही करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.
![](https://www.satyaprabhanews.com/wp-content/uploads/2024/01/image_editor_output_image1033401757-17053264075266517462763826053842-1024x768.jpg)
आज दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी क्षेत्रिय कार्यालय वजिराबाद अंतर्गत मालमत्ता क्र.३-६-५३२ पिन क्र.४०४०३०४१५८ या मालमत्ता धारकांकडुन रु.१,६८,२०१/-करापोटी मालमत्ता कराची रक्कम येणे बाकी होती. परंतु थकीत कराची भरणा करण्यास संबधित मालमत्ता धारकाने असमर्थता दर्शविल्यामुळे संबंधिताची मालमत्ता अटकावुन ठेवण्यात आली आहे तसेच मालमत्ता क्र.३-६-१०८ पिन क्र,४०४०३०२२२५ या मालमत्तेवर कर व पाणी कर रु.२,३२,९०७/-एवढी रक्कम येणे बाकी असल्यामुळे थकीत कराची रक्कम भरणा करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे संबंधिताची मालमत्ता अटकावुन ठेवण्यात आली आहे. सदरची कार्यवाही क्षेत्रिय अधिकारी संजय जाधव यांच्या नियंत्रनाखाली कार्यालय अधिक्षक गौतम कवडे, वसुली पर्यवेक्षक अक्षर अली, वसुली लिपीक गणेश बुंदेले, व विषेश वसुली पथकातील कर्मचारी श्रीकांत पुरस्तवार, शुभम तागडा, राहुल पाईकराव, राजुसिंग चंदेल यांनी संयुक्तपणे कार्यवाही केली.
महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांनी आपल्या मालमत्तेचा चालु व थकीत कराचा भरणा करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे व जप्तीसारखी अप्रिय घटना टाळावी, असे आवाहन उपायुक्त (महसूल) डॉ.पंजाब खानसोळे यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड