हदगाव/हिमायतनगर प्रतिनिधी /- यवतमाळ जिल्ह्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या साखर पूजन व शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे दि 10 जानेवारी रोजी आले होते त्यानंतर यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख व शिव दुताना मार्गदर्शन करण्यासाठी आखाडा बाळापूर येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यांमध्ये हदगाव येथील आंबेडकरवादी चळवळीचे युवा वक्ते प्रा.डॉ.नागराज मगरे सर यांनी काल हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील,विभागीय संपर्क नेते आनंद जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर साहेब ,तालुका प्रमुख विवेक देशमुख यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला
या बाबत सविस्तर वृत्त असे की शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंकल्प अभियान मोठ्या जोमाने राबविण्यात येत आहे या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख व शिव दुतांचा मार्गदर्शन व संवाद मेळावा आखाडा बाळापूर येथे आयोजित केला होता त्यामेळाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी आपला देश शेतीप्रधान देश आहे शेतकऱ्यांच्या घरात समाधान असेल पाहिजे या भावनेने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ते काम करणारे मुख्यमंत्री म्हणू ओळखले जातात त्यांनी गेल्या दीड वर्षात वेगवेगळ्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना मदत केली आहे त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेऊन हदगाव तालुक्यातील आंबेडकरवादी चळवळीचे युवा वक्ते वसमत येथील बहिर्जी कॉलेज येथील सीनियर लेक्चरर प्रा. डॉ.नागराज मगरे सर यांनी दिनांक 10 जानेवारी रोजी आखाडा बाळापूर येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला प्रा. मगरे यांनी मागील काळात उ.बा.ठा. गटाच्या सुषमा अंधारे यांचेअत्यंत निकटवर्तीय सहकारी म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर काम केले होते व ते उत्तम आंबेडकरवादी चळवळीचे वक्ते आहेत त्यांनी महाराष्ट्रभर त्यांचे व्याख्यान समाजापुढे देत समाजातील वंचित बहुजनांना न्याय मिळवून देण्याचे काम केले त्यामुळे अशा दमदार वक्त्याचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून घेतला यावेळी विभागीय संपर्क नेते आनंद जाधव, आमदार संतोष बांगर,संपर्कप्रमुख संतोष माने, नांदेड जिल्हा शिवसेनाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, हदगाव शिवसेना तालुकाप्रमुख विवेक देशमुख सह असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते