![](https://www.satyaprabhanews.com/wp-content/uploads/2024/01/IMG-20240109-WA0020-1024x768.jpg)
हिमायतनगर प्रतिनिधी/- अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे या संघटनेच्या हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी प्रभाकरराव पळशीकर यांची निवड करण्यात आली आहे.प्रभाकरराव पळशिकर हे हिमायतनगर तालुक्यातील नामांकित स्वस्त धान्य दुकानदार म्हणून सुपरिचित आहेत त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश गांजापुरकर यांनी प्रभाकर पळशीकर यांची स्वस्त धान्य दुकानदार तालुका संघटनेचे अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे
हिमायतनगर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनात्मक कामासाठीचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेवून हिमायतनगर तालुका अध्यक्ष म्हणून प्रभाकरराव पळशिकर यांची निवड करण्यात आली असल्याचे अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश गांजापुरकर यांच्या हस्ते नुकतेच पळशिकर यांना दि 8 जानेवारी रोजी नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. पळशिकर यांच्या निवडीबद्दल त्यांचे मित्र परीवारातून,योग समिती कडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत..