हिमायतनगर प्रतिनिधी/- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लागू केलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात महाराष्ट्र राज्यातील चालक-मालक संघटने कडून त्या कायद्याचा जाहीर विरोध करण्यात आला आहे व हा कायदा तात्काळ मागे घेण्यासाठी चालक-मालक संघटने कडून उद्या होणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आखाडा बाळापूर येथील सभेला हिमायतनगर तालुक्यातील एकही वाहन चालकाची गाडी भाड्याने दिली जाणार नाही अशी माहिती चालक-मालक संघटनेचे संतोष पुठ्ठेवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्यात शिवसेनेच्या वतीने शिव संपर्क अभियान मोठ्या जोमाने राबविण्यात येत आहे या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत त्यासाठी त्यांनी दिनांक 10 जानेवारी रोजी आखाडा बाळापूर येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे या सभेला हिमायतनगर तालुक्यातील चालक-मालक संघटनेने विरोध करून या सभेला हिमायतनगर तालुक्यातील कुठल्याही चालक-मालक संघटनेच्या खाजगी गाड्या भाड्याने दिल्या जाणार नाहीत असे सांगत जोपर्यंत केंद्र शासनाने लागू केलेला हिट अँड रन चा कायदा मागे घेणार नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना चालक-मालक संघटने कडून गाड्या भाड्याने दिल्या जाणार नाहीत अशी भूमिका येथील चालक-मालक संघटनेचे संतोष पुठ्ठेवाड ,अमोल चवरे,दत्ता बक्केवाड, रामेश्वर पिटलेवाड, आकाश जैस्वाल,विठ्ठल राठोड,अमोल गंगरपाड सह आदी जणांनी घेतला आहे