नांदेड दि.६ : विमुक्त जाती (अ) या प्रदर्शनामध्ये मागील अनेक वर्षांपासून बिगर मागास असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या घुसखोरी केली असल्यामुळे विमुक्त जाती अ या प्रवर्गात असलेल्या मुळ लाभार्थ्यांवर सातत्याने अन्याय होत असून शैक्षणिक तसेच नौकरीच्या क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. दरवर्षी साधारणतः नोकरी भरतीत व वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवेश प्रक्रियेत पाच हजार पेक्षा जास्त लोकांनी अवैध्यरित्या जात वैधता प्रमाणपत्र मिळवून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केलेली आहे. त्यामुळे आता देशभरात आंदोलन छेडण्यात येणार आहे. याचाच भाग म्हणून दिनांक 8 जानेवारी रोजी सारखणी ता किनवट जि नांदेड येथे गोर सेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
लोकांनी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या घुसखोरी केली असल्यामुळे विमुक्त जाती अ या प्रवर्गात असलेल्या मुळ लाभार्थ्यांवर सातत्याने अन्याय होत असून शैक्षणिक तसेच नौकरीच्या क्षेत्रात फार मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. दरवर्षी साधारणतः नौकरी भरतीत व वैद्यकिय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवेश प्रक्रियेत पाच हजार पेक्षा जास्त लोकांनी अवैधरित्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवून मोठया प्रमाणात विमुक्त जाती अ प्रवर्गात घुसखोरी केलेली आहे. त्यामुळे विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील लाभार्थी विद्यार्थी व बेरोजगार युवकांवर अन्याय होत असतांना दिसून येत आहे म्हणून दि. 08 जानेवारी 2024 ला सारखणी ता. किनवट जि. नांदेड येथे गोर सेना व सकल विमुक्त अ च्या अनेक संघटनेच्या वतीने हजारोंच्या संख्येने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचे प्रमुख नेतृत्व प्रा. संदेशभाऊ चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्ष गोर सेना हे करणार आहेत. या आधि देखील गोर सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर हिवाळी अधिवेशन नागपूर सह अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलने, केलेली आहेत. तरी अद्याप सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही म्हणून पुढे दिलेल्या मागण्या मान्य नाही केल्या तर या सरकारला घरचा रस्ता दाखविल्या शिवाय राहणार नाही. अशी तंबी प्रा. संदेशभाऊ चव्हाण यांनी दिली. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल 62 विधानसभा मतदार संघाच्या ठिकाणी गोर बंजारा समाज विमुक्त जाती (अ) मधील समाज. हा मोठया संख्येने असून त्यांच्या मतदानाच्या भरोश्यावर हे 62 आमदार निवडून येतात. म्हणून त्या 62 आमदारांची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी आमच्या मागण्या सोडवाव्यात. व 8 जानेवारी 2024 ला होणाऱ्या सारखणी ता. किनवट जि. नांदेड येथील रास्ता रोका आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. संदेशभाऊ चव्हाण यांनी केले.
विमुक्त जाती (अ) प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थ्यांसह खोटे प्रमाणपत्र वितरीत करणाऱ्या अधिकांऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी विशेष तपासणी पथक (SIT) लागू करण्यात यावी.,संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हयाच्या ठिकाणी जिल्हा जात वैधता पडताळणी समितीमध्ये विमुकत जाती (अ) प्रवर्गातील एक तज्ञ व्यक्तीस शासकीय प्रतिनिधी म्हणून नेमणूक करावी.,24 नोंव्हेंबर 2017 चा महाराष्ट्र शासनाकडून निर्गमीत झालेला रक्त नाते संबंधाचा निकष लावून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे शासन अधिसूचना त्वरीत रद्द करण्यात यावी., संपूर्ण महाराष्ट्रात खरे राजपूत भामटा जातीचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात त्या तालुकानिहाय जिल्हयाची यादी शासनामार्फत त्वरीत जाहीर करण्यात यावी राज्य मागास आयोगाचा अहवाल क्र. 49/2014 लागू करण्यात यावा., महाराष्ट्र शासनाने विमुक्त भटक्या जमातींना लागू केलेली उन्नत व प्रगत गटाची अट त्वरीत रद्द करण्यात यावी. या पत्रकार परिषदेत प्रा. संदेशभाऊ चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोर सेना, डॉ. राजेशभाऊ चव्हाण, अॅड. प्रदीप राठोड ओबीसी नेते, डॉ. प्रकाश जाधव, उकंडराव पवार जिल्हा उपाध्यक्ष गोर सेना आदी उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड