हिमायतनगर प्रतिनिधी /- शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयांमध्ये 3 जानेवारी 2023 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी स्त्रियांच्या शिक्षणाची सावित्री तूच खरी कैवारी…. तुझ्यामुळेच शिकते आहे आज प्रत्येक नारी…होती सावित्री म्हणून दिसला शिक्षणाचा प्रकाश.. नाही तर चुलीपुरतेच होते, स्त्री जातीचे आकाश…असा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा जागर करित त्यांना विनम्र अभिवादन करून अनमोल असे मार्गदर्शन केले
यावेळी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डी.के माने सर यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल बोंबले राजू यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.