हिमायतनगर प्रतिनिधी /-किनवट तालुक्यातील युवानेतृत्व म्हणून ओळख जाणारे तुषार घोगरे पाटील हुडीकर यांची भाजपा युवा मोर्चा नांदेड उत्तर जिल्हा चिटणीस पदी निवड करण्यात आली ते डॉ.अशोक पाटील सुर्यवंशी यांचे अत्यंत विश्वासू व नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांचे समर्थक अशी त्यांची मतदारसंघात ओळख आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे संघटन कौशल्य वाढविण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप राठोड यांनी तुषार घोगरे पाटील हुडीकर यांची नियुक्ती केली त्याच्या या निवडीचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला नक्कीच होणार असल्याची चर्चा जनतेतून ऐकावयास मिळत आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की भारतीय जनता पार्टी मध्ये तुषार घोगरे पाटील हे पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करण्याची शैली हे त्यांच्या सहकाऱ्याकडून ऐकावयास मिळत आहे तुषार घोगरे पाटील हुडीकर यांना भाजपा युवा मोर्चा नांदेड जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी देऊन तरुण वर्गात उत्साह संचारला असे दिसून येत आहे. पक्षाने मोठी जबाबदारी दिल्याने पक्षाचे ध्येय धोरणाच्या अधिन राहून काम करू असे यावेळी तुषार घोगरे यांनी सांगितले यावेळी किनवट माहूर निवडणूक प्रमुख व भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र डॉ. अशोक पाटील सुर्यवंशी सह आदी जणांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...