नांदेड दि.२८ :आगामी 2024 या वर्षांमध्ये आपल्याला दोन महत्त्वाच्या भारत निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या निवडणुका आहेत आणि त्यासाठी मतदार यादी मध्ये सर्वांचे नाव असणे आवश्यक आहे. एक नवीन यामध्ये अपडेट मतदार यादी पाच जानेवारी रोजी प्रकाशित होणार होती त्याला आता मुदतवाढ मिळाली असून ती 22 जानेवारी रोजी प्रकाशित होईल. याचा अर्थ साधारणता या पाच जानेवारीपर्यंत अजून जर काही नवीन अर्ज असतील तर आपण ते दाखल करू शकतो. विशेषतः यामध्ये नव मतदारांना माझा आवाहन राहील की आपण आपले पहिले मतदान असणार आहे त्यामुळे 18-19 वयोगटांमध्ये जे नवीन पात्र उमेदवार आहेत त्यांनी निश्चितपणे आपल्या नावाची नोंदणी करावी त्याचबरोबर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या मशीन बद्दल अधिक माहिती व्हावी यासाठी आपण सगळ्या कार्यालयांमध्ये व प्रत्येक गावांमध्ये सुद्धा मशीन्स ठेवल्या आहेत. त्यांचा एक प्रकारचा ट्रेनिंग किंवा त्याचा एक प्रत्यक्ष अनुभव देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुद्धा तशा काही डेमो मशीन ठेवल्या आहेत. या मशीनच्या फक्त अवेअरनेससाठी वापरतो त्याच्यावर तशा प्रकारचा पिवळा स्टिकर लावलेला असतो आणि त्या ठिकाणी काही कमी उमेदवारांची नाव आहेत आपण स्वतः जाऊन तिथं कास्ट करून बघू शकतो आणि आपलं मत आपण दाबलेला बटनालाच मिळाले का त्याची खात्री वेगळ्या मशीन मध्ये आपण करू शकतो. एकंदरीतच लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक प्रात्यक्षिक म्हणून एक सराव म्हणून हे संधी आपल्या सगळ्या नागरिकांसाठी आपल्या गावी उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड