नांदेड दि .१९: डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची 3 वर्षापासून प्रलंबित रक्कम त्वरित विद्यार्थ्यांना मिळावी,या संदर्भात फुल-शाहू-आंबेडकर विद्यार्थी कृती समिती नांदेड यांनी मा.प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग,लातूर यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मागील तीन वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेपासून वंचित आहेत.अर्ज भरून दिले असले तरी बहुतांश विद्यार्थ्यांना अद्याप योजनेची कोणतीही रक्कम मिळाली नाही,20-21,21-22 या शैक्षणिक वर्षासाठी 20कोटींची मागणी असताना फक्त 7 कोटी 73 लाख रुपये दिला असून उर्वरित 13 कोटी रुपये निधी दिल्यास 20-21,21-22 या शैक्षणिक वर्षातील सर्व स्वाधार पात्र विद्यार्थी पूर्ण होतील. 22-23 या शैक्षणिक वर्षासाठी 25 कोटी रुपये निधी लागणार आहे असे समाज कल्याण विभाग नांदेड यांनी कळविले 20-21,21-22,22-23 या तीन प्रलंबित वर्षासाठी 40 कोटी रुपये नांदेड समाज कल्याण विभागाला नांदेडला वितरीत करावा जेणेकरून जिल्ह्यातील स्वाधार पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. विद्यार्थी हे आर्थिक संकटात सापडलेले असून त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची प्रलंबित रक्कम विद्यार्थ्यांना देऊन त्यांचे मानसिक व आर्थिक शैक्षणिक समाधान करावे आणि नांदेड जिल्हा शैक्षणिदृष्ट्या विकसित होत असल्यामुळे हिंगोली,परभणी,यवतमाळ या जिल्ह्यातून विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी येत आहेत.त्यामुळे स्वाधार पात्र विद्यार्थी वाढत आहेत,असे निवेदनात म्हटले आहे तसेच निधी ७ दिवसात मिळाला नाही तर आपल्या कार्यालयापुढे बेमुदत उपोषण फुले,शाहू,आंबेडकर विद्यार्थी कृती समिती करेल,असा इशारा देण्यात आला आहे.या वेळी फुले-शाहू-आंबेडकर विद्यार्थी कृती समितीचे समन्वयक अमोल पट्टेकर,अक्षय गायकवाड, प्रकाश इंगोले,लक्ष्मण वाठोरे,अंकूश सावते,कुणाल भुजबळ, प्रबुद्ध काळे,जय येंगडे, प्रतिक्षा कांबळे,अंजली सुर्यवंशी,गजानन नरवाडे,रोहीत सोनकांबळे यांची उपआयुक्त समाजकल्याण लातूर येथे उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड