नांदेड दि.१२: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा 15/12/ 2023 पासून सुरू होत आहेत या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समिती व मालसा विधी विद्यार्थी संघटने तर्फे विद्यापीठाचे परीक्षा संचालक विभागाचे डॉ.दिगांबर एम.नेटके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की
15/12/2013 रोजी होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या कारण डिसेंबर महिन्यामध्ये एमपीएससी आयोग, यूजीसी,नेट,जिल्हा परिषद, आरोग्य विभाग तसेच वन विभागाच्या इत्यादी पदासाठी घेण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण परीक्षा आहेत आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सत्र परीक्षा याच कालावधीमध्ये असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन माननीय कुलगुरू महोदयांनी कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही हे लक्षात घेऊन विद्यापीठाच्या 15 डिसेंबर पासून होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या असे निवेदनात नमूद केले आहे यावेळी फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समितीचे समन्वयक लक्ष्मण वाठोरे मालसा जिल्हाध्यक्ष अश्विन तेहरा एस.पी. लॉ कॉलेज अध्यक्ष शिवा राठोड, उपाध्यक्ष सुशांत चोले,संकेत बंडेवार इत्यादी उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड