नांदेड: झारखंड राज्यातील काँग्रेसचे खा धीरज प्रस्ताव शाहू यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला असून 353 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. रोखड तपासण्यासाठी अधिकारी, कर्मचारी कमी पडले. मशीन बंट पडल्या. या कारवाईने काँग्रेसचा भ्रष्टाचार उघड झाला असल्याची टीका भाजपाचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी पत्रकार परिषदेत केली. 6 डिसेंबर रोजी आयकर विभागाने मदद्य निर्मिती कंपनी बलदेव साहू आणि समुहाच्या झारखंड आणि ओडिशा मधील 10 ठिकाणी छापे टाकले. काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू निवासस्थानी आयकर विभागाने धाड टाकून 353 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचारी कमी पडले. मशीन बंद पडल्या अधिकारी व कर्मचा-यांची संख्या वाढविण्यात आली बँकेच्या अधिकारी व कर्मचान्यांची मदत घेण्यात आली. त्यानंतर कारवाई पुर्ण झाली. या कारवाईत 353 कोटींची रोकड अप्त करण्यात आली. यावरून कॉग्रेसचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. राज्यसभेची खासदारकी ही राजकारणाच्या पलीकडे सुध्दा माणसाची गुणवत्ता पाहून दिली जाते. पण दारुच्या व्यवसायात असणा-या आणि ज्याच्या अनेक बेकायदेशीर व्यवसायातून अमाप संपत्ती कमवणान्या व्यक्तीला काँग्रेसने राज्यसभेची खासदारकी का दिलेली असेल, याचा विचार जनतेने करावा, परंतु काँग्रेसने कायम अशा भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घातलेलं आपल्याला दिसून येईल.
युपीए सरकारच्या 10 वर्षाच्या कॉग्रेसच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता व अजून ही सुरुच आहे. कोळसा घोटाळा, 2G घोटाळा, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये केलेला भ्रष्टाचार जनता अद्याप विसरली नाही महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री 100 कोटीचा हप्ता मागितला होता. त्या हप्त्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करण्यात आला. हीच काँग्रेसच्या राजकारणाची पध्दत राहिलेली आहे
देशाला बुडवण्यामध्ये काँग्रेसचा हात आहे. देशात विकासाची भरभराट करणार भाजपाच कमळ आहे. देशम्हणजे स्वतः ची वैयक्तीक ATM असल्यासारखा बाटल असलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी लुटला आहे यावरुन भारतातील जनतेला युपीए व भाजप सरकार मधील फरक लक्षात आलेला असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने विश्वास ठेऊन नुकत्याच तीन राज्यांतील जनतेने कॉग्रेसला नाकारल.भाजपाला प्रचंड बहुमत दिले. याचे मुख्य कारण काँग्रेसच्या मनमानी, अकार्यक्षम, भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळली आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांना मोदींच्या गैरटीवर विश्वास आहे कॉग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची गैरटी असते आणि जिथे भाजपाची सत्ता असते तिथे विकासाची म्हणजेच मोदींची गॅरटी असते, असेही कंदकुर्ते म्हणाले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड