हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- तालुक्यातील मौजे देवाची बोरगडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची एक बैठक आज दिनांक 9 डिसेंबर रोजी घेण्यात आली त्या बैठकीत उपस्थित पालक व गावकऱ्यांनी सर्वांनुमते शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुंडलिक मारोती यनगुलवाड यांची व उपाध्यक्ष पदी सोपान भैरेवाड यांची बिनविरोध निवड केली या निवडीबद्दल उ. बा.टा.गटाच्या शिवसेनेचे तालुका संघटक संजय काईतवाड यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिरगिरे सर, जाधव सर, व राजा भगीरथ शाळेचे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक के.बी शैनेवाड सर ,विलास काईतवाड, शंकर भैरवाड , संतोष शिंदे,सोपान पांचाळ ,साईनाथ गोपुवाड ,अरविंद डोंगे, सोपान काईतवाड ,मारोती गुजलवाड, यांच्या सह ,पालक व सर्व सदस्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते