हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सर्व मातंग समाज बांधवांनी दि १३ डिसेंबर रोजी यशवंत स्टेडीयम नागपूर येथे होत असलेल्या आरक्षण वर्गीकरण मोर्चात सामील होण्यासाठी हिमायतनगर तालुक्यातील जास्तीत जास्त मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णु भाऊ कसबे यांना पाठीबा द्यायचा आहे आणि मातंग समाजाची एकजुट दाखवायची आहे. तरी हिमायतनगर तालुक्यातील मातंग बांधवांनी जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहावे,असे आवाहन तालुका अध्यक्ष राजुभाऊ गायकवाड व युवा ता.अध्यक्ष विकास गाडेकर,कोर कमीटी तालुका अध्यक्ष दयानंद वाघमारे,प्रदीप तपासकर तानाजी गाडेकर प्रशांत महाजन, सुनिल गुंडेकर,यांनी केले आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की मातंग समाजाच्या हक्कासाठी अ.ब.क.ड.च्या आरक्षण वर्गीकरणासाठी प्रशासनाला जागे करण्यासाठी विष्णु कसबे लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष,गादेकर लहुजी शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष, कैलास खंदारे लहुजी शक्ती सेना प्रदेश अध्यक्ष, सचिन भाऊ क्षीरसागर लहुजी शक्ती सेना युवक प्रदेशाध्यक्ष व सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी यांना सोबत घेउन अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने करण्यात आली या सर्व मातंग समाजाला अबकड आरक्षण वर्गीकरण मिळविण्यासाठी अनेक वेळा मोर्चावर लाठी हल्ला करण्यात आला, लोटांगण आंदोलनात विष्णुभाऊ कसबे यांच्या पाठीला जखमा झाल्या होत्या त्यामूळे आता येत्या दि १३ डिसेंबर रोजी यशवंत स्टेडीयम नागपूर येथे होणाऱ्या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मातंग समाजाच्या हक्कासाठी अबकड आरक्षण वर्गीकरण करण्यासाठी वंदनीय लहुश्री विष्णुभाऊ कसबे यांना साथ देण्यासाठी हिमायतनगर तालुक्यातील जास्तीत जास्त मातंग समाज बांधवांनी उपस्थित राहावे,असे आव्हान अध्यक्ष राजुभाऊ गायकवाड युवा ता.अध्यक्ष विकास गाडेकर,कोर कमीटी तालुका अध्यक्ष दयानंद वाघमारे,प्रदीप तपासकर तानाजी गाडेकर प्रशांत महाजन, सुनिल गुंडेकर,यांनी केले आहे