2024 च्या प्रजासत्ताक दिनी ‘ बडे मियाँ छोटे मियाँ’ चा टीझर येणार
“टायगर इफेक्ट” सध्या सोशल मीडिया वर बघायला मिळत असून त्याच्या चाहत्यांसाठी ही एक उत्सुक बातमी असणार आहे. टायगर चा आगामी चित्रपट “बडे मियाँ छोटे मियाँ” चे निर्माते प्रजासत्ताक दिन 2024 च्या शनिवार व रविवार दरम्यान चित्रपटाचा डायनॅमिक ट्रेलर रिलीज करणार असल्याच कळतंय.
बॉलिवूडचा अॅक्शन सुपरस्टार आणि युथ आयकॉन टायगर श्रॉफ या चित्रपटात अॅक्शन लिजेंड अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेयर करणार आहे आणि हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.
एका विश्वासार्ह स्त्रोताने खुलासा केला आहे ” टीझर कट लॉक केला आहे आणि त्यात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या अॅक्शनचा समावेश आहे. तो सध्या पोस्ट-प्रॉडक्शनच्या अंतिम टप्प्यात आहे आणि चित्रपटाची टीम प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शनिवार किंवा रविवार च्या दरम्यान रिलीज करणार आहेत”
चाहते प्रजासत्ताक दिना ची वाट बघत असून हे स्पष्ट आहे की टायगर श्रॉफ दमदार एंट्री घेऊन टीझर लॉन्चसह स्क्रीनवर वर्चस्व गाजवणार आहे. “बडे मियाँ छोटे मियाँ” व्यतिरिक्त टायगरकडे सिद्धार्थ आनंद निर्मित आणि रोहित धवन दिग्दर्शित “रॅम्बो”, जगन शक्ती दिग्दर्शित “हीरो नंबर 1,” आणि रोहित शेट्टीचा “सिंघम अगेन,” असे उत्साहवर्धक प्रोजेक्ट आहेत.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड