Nashik-Pune highway Accident : नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune highway) भीषण अपघात झाला आहे. शिर्डीहून आळंदीकडे जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसला. यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर या अपघातात सुमारे 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. संगमनेर तालुक्यातून जाणार्या पठार भागातील नाशिक-पुणे महामार्गावरील मैल 19 (खंदरमाळवाडी) परिसरात रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Parth Pawar पुन्हा एकदा मावळ लोकसभा लढवणार का ? LetsUpp Marathi
शिर्डीपासून काही अंतरावर निमगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर आहे. तेथून दरवर्षी शिर्डी ते आळंदी अशी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केलं जातं. यामध्ये शिर्डी व परिसरातील गावातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात. ही दिंडी शिर्डीहून नाशिक-पुणे महामार्गावरून संगमनेरमार्गे आळंदीकडे जात होती, त्याचवेळी मैल 19 (खंदरमळवाडी) पठार परिसरात विठ्ठल नामाचा नामाचा जयघोष करत जाणाऱ्या दिंडीत कंटेनर घुसला. या अपघातात चार वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ वारकरी गंभीर जखमी झालेत.
लग्न न करण्याची शपथ घेतली; पण पहिल्याच भेटीत शिवराज सिंह प्रेमात पडले
ताराबाई गंगाधर गमे (वय 52, रा. कोऱ्हाळे, ता. राहाता), भाऊसाहेब नाथा जपे (वय 50, रा. कणकुरी, ता. राहाता), बबन पाटीलबा थोरे (वय 65, रा. द्वारकानगर, शिर्डी, ता. राहाता) बाळासाहेब अर्जुन गवळी (वय 50, मढी, कोपरगाव) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
तर बिजलाबाई अशोक शिरोळे (वय 55 रा. वाकडी, ता. कोपरगाव), राजेंद्र कारभारी सरोदे (वय 55, रा. मढी, ता. कोपरगाव), भाऊसाहेब दशरथ गायकवाड (वय 69, रा. वेस, ता. कोपरगाव), ओंकार नवनाथ चव्हाण (वय 17, गाव मढी खुर्द, ता. कोपरगाव), निवृत्ती पुंजा डोंगरे (वय 75, गाव पाचळे, जि. सिन्नर, जि. नाशिक), शरद सचिन चापके (वय 17, गाव परभणी), अंकुश ज्ञानेश्वर कराळे (वय 35, रा. ज्ञानेश्वर मंदिर, शिर्डी), मीराबाई मारुती ढमाले (वय 60, रा. दुशिंगवाडी, वावी, जिल्हा सिन्नर, जिल्हा नाशिक) अशी जखमींची नावे आहेत. सध्या जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातास कारणीभूत असलेला ट्रक क्रमांक (एमएच १२ व्हीटी १४५५) चा चालक दारूच्या नशेत गाडी चालवत होता. त्यातच त्याला झोप लागल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी कंटेनरची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. दरम्यान, आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने मदत करून जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. कार्तिकी एकादशीच्या दिवशी आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातल्यां सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय.
संबंधित बातम्या
वेब स्टोरीज