नांदेड दि.२६: भारत देशामध्ये जवळपास 3000 पेक्षा जास्त राजनितीक पक्ष आहेत. निर्वाचन आयोग हे त्या पक्षावर नियंत्रण ठेवणारे आहे, त्या पक्षाचे मालक नाहीत. शिवसेना पार्टी मध्ये वेगवेगळे गट दाखवून दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी एकनाथ शिंदे विरुध्द उध्दव ठाकरे असा वाद दाखवून एका पार्टीत दुसरा गट बनविण्याचा कोणताही अधिकार नसताना आणि एका केस मध्ये लागलेला न्याय निर्णय दुसऱ्या केस मध्ये त्याचा सदर्भ देण्याचा संवैधानिक कोणतीही कलम नसताना सन 1968 मध्ये लागलेल्या न्यायालयीन आदेशाचा संदर्भ देऊन गैरकायदेशीर पध्दतीने एकनाथ शिंदे यांना आयोगाने शिवसेना पार्टी दानामध्ये दिली. हा सर्व प्रकार गैरकायदेशीर असल्यामुळे प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीच्या वतीने निर्वाचन आयोगास दि. 17-10-2023 रोजी निवेदन देण्यात आले होते व त्यामध्ये त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. परंतु सदर निवेदनावर निर्वाचन आयोगाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर अद्याप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे निर्वाचन आयोगातील जबाबदार राजीवकुमार व त्यांचे सहकारी यांच्यावर सुप्रिम कोर्टातून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सदर निवेदनाच्या प्रति महामहिम राष्ट्रपती महोदय, मा. प्रधानमंत्री महोदय, मा. गृहमंत्री, कायदे मंत्री महोदय भारत सरकार व आदरणीय सुप्रिम कोर्ट यांना 127 पेज पुरावे व व्ही.डी.ओ. शुटींगसह निवेदन देण्यात आले होते. सदर बाब ही गंभीर असून गैरकायदेशीर पध्दतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीच्या वतीने आदरणीय सुप्रिम कोर्टातून गुन्हा दाखल करणार आहोत. #सत्यप्रभा न्युज #नांदेड