हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- भारत सरकारचे वित्त राज्य मंत्री श्री. भागवत कराड जी यांच्या सोबत हिंगोली लोकसभा संयोजक डॉ.श्रीकांत पाटील यांनी मराठवाड्यात व विशेषतः हिंगोली जिल्ह्यात रोजगार निर्माण, औद्योगिकीकरण, मूलभूत सुविधा, आरोग्य सेवा व अश्या अनेक विकासकामां साठीच्या निधीसंकल्पनेवर विभागीय सचिवांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली त्यात त्यांनी निधी संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे डॉ.श्रीकांत पाटील यांनी सांगितले….
या बाबत सविस्तर वृत्त असे की छ. संभाजीनगर जिल्हा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांचा एकूण औद्योगिक रोजगारातील हिस्सा अर्धा टक्क्यापेक्षाही कमी आहे. गरीब शेतकऱ्याच्या मुलांना पुणे-मुंबईसारख्या महानगरात आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार नाही या साठी जिल्हानिहाय कौशल्य विकास व रोजगार केंद्राची संख्या वाढविण्याचे लक्ष या बैठकीत ठरवण्यात आले आहे.. मराठवाड्याची अर्थव्यवस्था ही कृषि शेत्रावर आधारीत असल्यामुळे पाण्याचे हक्काचे स्रोत मर्यादित आहेत आणि कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त झाल्यामुळे नवीन इंड्स्ट्रीज येण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे डॉ. श्रीकांत पाटील यांनी सांगितले.मराठवाड्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, ऊस आणि काही प्रमाणात कडधान्ये पिकवली जातात. त्यांच्या बाजार भावातून पिकाचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न अल्प आहे. या समस्येसाठी कृषी विद्यापीठ व जमीन-माती निरीक्षण करून उपयुक्त रोपांची लागवट करण्याने शेतकऱ्याच्या उत्पन्नात कमालीची वाढ होईल यासाठी हिंगोली जिल्ह्यात केंद्र सरकार च्या मदतीने निधी उपलब्ध कसा करता येईल व त्या अनुशंघाने जिल्ह्याच्या तळा-गळात हा निधी रस्ते, रुग्णालय व शाळा अश्या विकासकाऱ्यांच्या मदतीने कसा पोहचवता येईल यावर भारत सरकारचे वित्त राज्य मंत्री श्री. भागवत कराड यांच्या सोबत भाजपा हिंगोली लोकसभा संयोजक डॉ.श्रीकांत पाटील यांच्या सोबत यशस्वी चर्चा संपन्न झाली. या बैठकीत अशा कामांसाठी त्वरित उपाययुक्त ठरणारं आणि प्रभावी निर्णय घेतल्याच्या सूचना मिळाल्या आहेत त्यामुळे मराठवाड्यातील विकासां साठी एक नवीन क्षेत्रे उभारण्यात आणि समृद्धीसाठी नवीन प्रकल्पे सुरू होतील यात शंका नाही असे श्रीकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे…..