हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-शहरात आज दि 13 नोव्हेंबर रोजी सकाळी दीपावली निमित्त हदगाव हिमायतनगर तालुक्यातील लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या वायु प्रदूषण रोखण्यासाठी फटाके न फोडण्याचे आदेश दिले होते त्याचे पालन करून शहरातील नडवा नाली व रस्ता बांधकाम व उमर चौक पारडी रोड सिमेंट रोडचे बांधकाम मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित होते हा शहरातील सर्वात महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न आज आमदार साहेबांनी दीपावलीच्या दिवशी मार्गी लावला येथील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती याच रस्त्याचा भूमिपूजन सोहळा आज फटाके न फोडता विकासाचे नारळ फोडून नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी विकासाची दिवाळी केली असल्याचे मत शहरातील अनेक सुजाण नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे…
याबाबत सविस्तर वृत्त असे की हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष म्हणून आमदार माधराव पाटील जवळगावकर यांना ओळखले जाते तीच जिद्द व विकासाचे ध्येय ऊराशी बाळगून दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर हिमायतनगर शहरातील नागरिकांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कनकेश्वर मंदिर तलावाकडे जाणाऱ्या नडवा रस्त्याची अत्यंत दैनिक अवस्था झाली होती त्याचबरोबर हिमायतनगर शहरातील उमर चौक ते वाशी रस्त्याची सुद्धा अत्यंत दैनिय अवस्था झाल्याने या भागातील नागरिकांना रस्त्याने प्रवास करताना धुळीचा व खड्ड्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता हीच मागणी लक्षात घेऊन दीपावलीच्या दिवशी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी ह्या रस्त्याचे भूमिपूजन करून शहरातील नागरिकांना दिवाळीची भेट दिली आहे यावेळी नडवा नाली व रस्ता बांधकाम ,शिरंजनी रोड नाली ते नडव्यापर्यंत नाली बांधकाम व उमर चौक पारडी रोडच्या सिमेंट रोडचे बांधकामाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला त्यानंतर हिमायतनगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटीचे विश्वस्त यांच्या मागणी नुसार श्री परमेश्वर महाराज यांच्या प्रतीकात्मक फोटोचे अनावरण केले यावेळी प्रफुल्ल मुधोळकर यांनी आयटीआय ते शिरंजनी रोड जाणाऱ्या पांदण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अशी विनंती केली असता त्यांनी लवकरच हा प्रश्न मार्गी लाऊ असे शासकीय गुत्तेदारां समोर आश्वासन दिले यावेळी शासकीय गुत्तेदार सुरेश पळसीकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे तुंगेवार,डांगे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड , समद खान ,काँग्रेस तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्धन ताडेवाड ,प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद, शहराध्यक्ष संजय माने , सुभाष शिंदे,काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान, प्रतिष्ठित व्यापारी प्रवीण कोमावार ,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे,परमेश्वर गोपतवाड ,योगेश चिलकावार,बाकी सेठ,बाळू पाटील टाकराळेकर,अनिल पाटील, पंडित ढोणे,मोहन ठाकरे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती आबेकर,सह पत्रकार , व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते