भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) याला जगातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज म्हणून घोषित करण्यात आले आहे. आयसीसीनं (ICC) जारी केलेल्या एकदिवसीय क्रमवारीनुसार, शुभमन गिल आता वनडे फॉरमॅटमध्ये जागतिक क्रमवारीत नंबर 1 फलंदाज आहे. यापूर्वी वनडे फॉरमॅटमध्ये नंबर 1 चा मुकुट पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्या डोक्यावर होता. मात्र, आता शुभमन गिलनं बाबर आझमला मागे टाकत आयसीसी क्रमवारीत नंबर 1 स्थान पटकावलं आहे.
शुभमन गिल गेल्या एका वर्षापासून फॉर्ममध्ये आहे. एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 अशा तिनही फॉरमॅटमध्ये त्यानं चमकदार कामगिरी केली आहे. एकदिवसीय फॉर्मेटमध्ये शुभमन गिलनं इतकी चांगली कामगिरी केली की, भारतीय संघ व्यवस्थापनाला शिखर धवनसारख्या तेजस्वी खेळाडूकडेही दुर्लक्ष करावं लागलं. गिलनं सातत्यानं केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे अल्पावधीतच टीम इंडियाचा सलामीवीर म्हणून कर्मधार रोहितसह धुरा आपल्या खांद्यावर घेतली.
A big day for India's #CWC23 stars with two new No.1 players crowned in the latest @MRFWorldwide ICC Men's ODI Player Rankings 😲
Details 👇https://t.co/nRyTqAP48u
— ICC (@ICC) November 8, 2023
टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलनं पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत ICC एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या ओपनिंग पार्टनरनं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकलं आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी बाबर आझम पहिल्या क्रमांकावर होता. स्टार फलंदाज शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्यामुळे वर्ल्डकपसाठी उशिरा प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याचा उशिरा समावेश करण्यात आला. एकीकडे शुभमन गिलनं जबरदस्त परफॉर्मन्स दिला, तर दुसरीकडे बाबर आझमला एका एका धावेसाठी मोठी कसरत करावी लागत होती.