नांदेडदि.१ : पोलीस अधिक्षक आणि अपर पोलीस अधिक्षक यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना दगडफेक करून जखमी करणाऱ्या 46 जणांच्या नावासह अनोळखी 10 ते 15 जणांविरुध्द कुंटूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यातील 41 लोकांना अटक करण्यात आली आहे.वृत्तलिहिपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळविण्यासाठी न्यायालयात नेण्याची प्रक्रिया सुरू होती.
कुंटूर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल नागेशराव बहात्तरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.30 ऑक्टोबर रात्री 10 वाजल्यापासून बिना परवाना बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू झाले. मी व माझे सहकारी पोलीस अंमलदार तेथे गेलो असतांना सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी झाडे, काठ्या, दगडे, मोठे टायर जाळून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत घोषणा देत होते. त्यामुळे हैद्राबादकडे जाणारा रस्ता बंद झाला होता.
31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास आंदोलनकर्त्यांमधील संतोष दासराव जाधव, मनोहर बालाजी जाधव, मारोती रामराव जाधव, कृष्णा संभाजी जाधव, शंकर बालाजी थेटे, व्यंकट गोविंद जाधव, योगेश सुधाकर जाधव, मारोती गोविंद जाधव, शिवाजी नागोराव जाधव, माधव सुधाकर जाधव, दत्ता रामराव जाधव, साहेबराव परशुराम अडकिणे, महेश विठ्ठलराव जाधव, शेख शादुल शेख शोकत, शिवम दिगंबर कागडे, मारोती प्रल्हाद जाधव, शंकर बाबा गाडगे, किरण सुर्यकांत जाधव, गणेश व्यंकट जाधव, तिरुपती संभाजी जाधव, शाहदत्त शिवाजी जाधव, योगेश लक्ष्मण जाधव, श्रीकांत गोविंद कदम, विजय बालाजी जाधव, अंकुश संभाजी जाधव, व्यंकट शंकर पवार, संभाजी औसाजी कदम, अमोल नावंदे, अमोल लंगोटे, गजानन जाधव, प्रदीप जाधव, सुरज नादरे, श्रीनिवास जाधव, धिरज जाधव सर्व रा.कृष्णूर ता.नायगाव तसेच माधव प्रल्हाद तोडे, ज्ञानेश्र्वर गजानन शिंदे रा.अंतरगाव ता.नायगाव तसेच माधव संभाजी पांडे रा.रुई (बु), गजानन रामराव पांचाळ रा.कोकलेगाव, गजानन पंढरी ताटे रा.चव्हाणगल्ली नायगाव, सदाशिव सिताराम जाधव, ओंकार जाधव रा.निळेगव्हाण, शिवशंकर आनंदा कदम, दत्ता बालाजी कदम रा.हिप्परगा, दत्ता बालाजी कदम, रा.भायेगाव, रमेश बालाजी ढगे रा.वझीरगाव यांच्यासह अनेक व्यक्ती ज्यांची नावे माहित नाहीत अशा सर्वांनी मिळून एम.एच.26 बी.एक्स.5357 या पोलीस गाडीची तोडफोड केली. अनेक खाजगी वाहनांना तोडफोड करून त्यांचे नुकसान केले. ध्वनीक्षेपकावर हा बेकायदा जमाव आहे. तुम्ही परत जा अशा सुचना पोलीस देत असतांना जमावाने दगडफेक केली. त्यात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस अंमलदार गजानन मगर, लक्ष्मण मारगोंडे, अभिजित पाटील, रविकुमार हाराळे, योगेश बोधगिरे, अनिलकुमार गायधने, राजू तेलंग, मनोज पारदे, शेख मोहम्मद अलीम मोहम्मद रहिम, संतोष वागदकर असे पोलीस जखमी झाले.
जमाव आणखी अक्रमक होईल, गाड्यांची तोडफोड करेल आणि आग लावेल म्हणून पोलीसांनी आपल्या अधिकाराप्रमाणे बळाचा वापर करून जमाव पांगवला. त्या प्रकरणी कुंटूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यातील जवळपास 41 जणांना अटक करण्यात आली आहे. वृत्त लिहिपर्यंत या 41 जणांना न्यायालयातून पोलीस कोठडी मिळविण्यासाठी नेण्याची प्रक्रिया पुर्ण झालेली नव्हती.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड