![](https://www.satyaprabhanews.com/wp-content/uploads/2023/10/IMG_20231030_174621-762x1024.jpg)
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/ संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गरमावलेला असताना आरक्षणाच्या संदर्भात समाजाप्रती कर्तव्य समजुन मराठा आरक्षण मिळे पर्यंत हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांनी राजीनामा दिला आहे.
महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. माझ्या समाज बांधवांची अपेक्षा आहे की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत राजकिय दृष्टया मी कुठेही कार्यरत असु नये, हीच समाज भावना लक्षात घेता मी समाजाप्रती निष्ठा व कर्तव्य समजुन मी माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख, नांदेड पदाचा राजीनामा देत आहे. आणि माझ्यावर समाजाचा व पक्षाचा खुप विश्वास आहे. पक्षाने माझ्यावर मोठ्या अपेक्षेने नांदेड जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी टाकली होती ती जबाबदारी मी स्वीकारून एक सच्या निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन स्व. बाळासाहेबांचा व आपला सदैव एकनिष्ठ राहून काम करणार आहे जो पर्यंत माझ्या मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत मी पदाचा त्याग करत आहे असे पत्र त्यांनी शोषल मीडियावर व्हायरल केले आहे व मराठा योध्दा श्री मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजा साठी उपोषण सुरू आहे मी आणि माझा पक्ष मराठा समाजाच्या सोबत उभा आहे मी समाजाचा आहे समाज माझा आहे असे प्रतिक्रिया माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केली.