हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-तालुक्यातील मौजे कामारी येथील सुदर्शन देवराय या तरुण युवकांने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले होते त्यामुळे या घटनेचा हिमायतनगर शहरासह तालुक्यातील सर्व बांधवांनी जाहीर निषेध करून पीडित कुटुंबांना शासना कडून तात्काळ मदत मिळावी म्हणून एक दिवस बंद पुकारला होता तेव्हा हिंगोली लोकसभेचे श्रीकांत भाऊराव पाटील यांनी त्या मयत कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जिम्मेदारी उचलत त्यांना अ जीवन दर महिन्याला दहा हजार रुपये देण्याची सुरवात केली व शासनाकडून सुद्धा लवकरच मदत मिळून देतो असे सांगितले होते त्यामुळे त्यांनी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी पीडित मयताच्या नातेवाईकांची नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी अभिजीत राऊत साहेब यांची भेट घेऊन शासनाकडून पिडीतांच्या कुटुंबास तात्काळ मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत व लवकरच त्यांना शासनाची सुद्धा मदत मिळेल असे संगितले…या बाबत सविस्तर वृत्त असे की भारतीय जनता पार्टीचे हिंगोली लोकसभेचे नेते डॉ. श्रीकांत पाटील यांनी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन स्वर्गीय सुदर्शन देवराई यांनी मराठा समाजासाठी दिलेल्या बलिदाना संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या कडून शासनाने तात्काळ पाच लाखाची मदत जाहीर करतो असे आश्वासन दिले होते पण त्याची अद्याप पूर्तता झाली नसल्यामुळे श्रीकांत पाटील यांनी स्वतःहा नांदेड चे जिल्हाधिकारी यांच्या सोबत एक बैठक लावून ज्ञानेश्वरी सुदर्शन देवराई ताईला लगेच पाच लाखाची तात्काळ मदत करा असे निर्देश दिले सध्याची परिस्थिती पाहता डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी ज्ञानेश्वरी ताईला दहा हजार रुपये प्रति महिना असे अ जीवन देण्याचा संकल्प केला व तो लगेच सुरुवात पण केली शासनाने याबाबतीत अद्याप पाऊल उचलले नसल्यामुळे त्यांनी ही बैठक घेऊन मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला व कलेक्टर साहेबांची बैठक घेऊन त्यांना तात्काळ मदत व्हावी व त्यांचे आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे दोन चिमुकली मुले आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी येत्या आठ ते पाच दिवसात देवराये कुटुंबाच्या खात्यात पाच लाख रुपये जमा होतील अशी ग्वाही दिली आहे.
यावेळी त्यांच्या सोबत कामारी येथील ग्रामस्थ व पिडीत कुटुंबाचे नाते वाईक उपस्थित होते…