हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावातील मराठा बांधव सुदर्शन देवराये यांनी बलिदान दिले होते तेव्हा मराठा समाज बांधवांनी त्यांना मदत करावी असे आव्हान केले त्या दिवसांपूर्वी सुदर्शन देवराये यांच्या कुटुंबाला मदत देण्यासाठी शिवशंभू विज प्रतिष्ठाण यांनी पुढाकार घेऊन एकूण 183962 रू एवढा निधी जमा केला व आज दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी आदिशक्तीच्या आगमनाच्या दिवशीच कै.सुदर्शन देवराये यांची पत्नी ज्ञानेश्वरी सुदर्शन देवराये यांना धनादेशाचा चेक देऊन मदत केली
या बाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील कामारी येथील सुदर्शन यांचे बलिदान मराठा बांधव कधीच विसरणार नाहीत व यापुढेही तुम्ही स्वतःला कधीही एकटे समजू नये, समस्त मराठा बांधव व शिवशंभू वीज प्रतिष्ठान तुमच्या सदैव पाठीशी असल्याचे श्री महेश वाघमारे पाटील (अध्यक्ष शिवशंभू विज प्रतिष्ठाण नांदेड महावितरण महापारेषण) यांनी केले.यावेळी श्री पांडुरंग बोडके साहेब,श्री राजकुमार पवार साहेब ,शंकर कदम ,कैलास मोरे,वैभव मोरे,सुनील लंगडे पाटील, श्री परमेश्वर शिंदे पाटील तालुका अध्यक्ष उपविभाग हिमायतनगर ,गजानन कल्याणकर,उध्दव ढगे,साईनाथ कल्याणकर ,बालाजी जाधव,प्रविण चव्हाण सह आदी कर्मचारी वर्ग व प्रतिष्ठित गावकरी मंडळी उपस्थित होते.
आपण सर्वांनी मिळून केलेला हा मदतीचा हात कामारी येथील मराठा समाज बांधव कधीही विसरणार नाही त्याबद्दल सकल मराठा समाज बांधव कामारीकरांच्या वतीने शिवशंभू विज प्रतिष्ठानचे आभार मानले.