हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- जरांगे पाटलांनी महाराष्ट्र शासनाकडे एक महिन्याची मुदतवाढ मागून मरराठा आरक्षणाचा तिढा कायमस्वरूपी सोडवा अशी विनंती केली होती त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर एक महिना सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या दरम्यान हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी येथे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी येथील एका नवतरुण युवकांनी आरक्षणासाठी गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली होती तेव्हापासून कामारी येथील उपोषण चर्चेत आले त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाघी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचा ठराव घेऊन कामारी येथील साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा देत समस्त सकल मराठा समाज बांधवांनी या उपोषण स्थळी एक दिवस साखळी उपोषणात सहभाग घेतला होता….
या बाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील दुय्यम बाजारपेठ असलेल्या कामारी येथील सकल मराठा समाज बांधवांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील, दत्तात्रय पाटील हडसणीकर यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा म्हणून १४ सप्टेंबरपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. त्याच्या साखळी उपोषणास गावांतील बौद्ध, मातंग, मुस्लिम समाज बांधवांनी एक-एक दिवस साखळी उपोषण करून पाठिंबा दिला आहे. तालुक्यातील मौजे वाघी येथील मराठा समाज बांधवांसह 34 समाज बांधवांनी दि 10 ऑक्टोबर रोजी म्हणजे 26 व्या दिवस साखळी उपोषण करून कामारी येथील सकल मराठा समाजाच्या आरक्षण मागणीस जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यात सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांचा समावेश होता यावेळी मोजे वाघे येथील ग्रामपंचायत ठराव घेऊन या कामारी येथील उपोषणास त्यांनी पाठिंबा दिला यावेळी रावसाहेब माने, अजय परसराम देवसरकर, गणेश हमद, संतोष खांडरे ,श्रीराम माने,विकास माने, तातेराव देवसरकर, सह असंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते..