हिमायतनगर प्रतिनिधी /-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका बघता यावर्षी जिल्ह्यात रुग्णांची आकडेवारी कमी झाली आहे. हिमायतनगर तालुक्यातील 18 गावान मध्ये एक गाव एक गणपती मांडण्याची तेथील नगिकांची संकल्पना आहे अशाच पद्धतीने एक गाव एक गणपतीची स्थापना करून गावो गावी आदर्श घडवून द्यावा व इतर सर्व अनावश्यक खर्चाला फाटा देत शहरातील गणेश मंडळांनी रक्तदान शिबिर आयोजित करावेत असे मत पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनुर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मांडले.
यावेळी बोलताना हिमायतनगर येथील पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनुर यांनी असे सांगितले की मागील दोन वर्षा पासुन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पोलीस स्थानकात श्री गणेशाची मनोभावें 10 दिवस स्थापना करून त्यांची आरती करण्यात येत आहे त्यामुळे सर्व कर्मचारी एकोप्याने राहून नियमित गणरायाची आरती करतात अशाच पद्धतीने सर्वांनी एकोप्याने राहून लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना जनतेसमोर मांडली. मात्र यात संकल्पनेला बऱ्याच ठिकाणी चढाओढ होत आहे या स्पर्धेच्या युगात तिलांजली मिळत असल्याचे चित्र आहे. मात्र, याला अपवाद म्हणून हिमायतनगर तालुक्यातील 18 गावात 1 गाव 1 गणपती मांडण्याची संकल्पना आजही सुरू आहे हिमायतनगर हे आदिवासी वाड्यातील कुशीत आणि पैनगंगा नदीच्या काठावर वसलेला तालुका आहे या तालुक्यात बऱ्याच ठिकाणी गेल्या 50 वर्षापासून ‘एक गाव, एक गणपती, एक मूर्ती आणि एक उत्सव’ अशी संकल्पना कोणताही खंड न पडता अविरतपणे सुरू आहे व हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्या मुले सर्व तालुक्यात एकूण 91 गणपतीची स्थापना करण्यात आली त्यात शहरात 28 गणपती व ग्रामीण भागात 63 गणपती स्थापन करण्यात अल आहेत त्यामधील 7 दिवसांच्या गणरायांचे विसर्जन 9 ठिकाणी ,9 दिवसाच्या गणेशाचे दर्शन 14 ठिकाणी व उर्वरित सर्व गणेशाचे विसर्जन दि 28 स्पटेंबर रोजी होणार आहे त्यांच्या बंदोबस्त कामी हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीवर करडी नजर ठेवण्यासाठी 4 पोलीस अधिकारी,40 पोलीस कर्मचारी , नव प्रविष्ट 5 महिला पोलिस कर्मचारी ,10 पुरुष कर्मचारी व ग्रह रक्षक दलाचे 25 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत त्यामुळे गणेशाच्या विसर्जनासाठी हिमायतनगर पोलिसांची टीम सुद्धा तयार असल्याचे पोलीस निरीक्षक यांना सांगितले
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, आदिनाथ पाटील,पोलीस निरीक्षक स्मिता जाधव मॅडम,बीट जमादार कोमल कांगणे मॅडम, डी.एस.बी.कुलकर्णी,सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते