हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदी सुधाकर भोयर यांची निवडी झाल्यानंतर आता हिमायतनगर तालुकाध्यक्ष निवडीकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजपामध्ये आगामी लोकसभा व विधानसभा व हिमायतनगर शहरातील नगर पंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक फेरबदल झालेले पहावयास मिळत आहेत. २०२४ मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद व नगर पंचायतच्या होणाऱ्या निवडणुकीचे महत्त्व लक्षात घेऊन हिमायतनगर येथील भारतीय जनता पार्टीचे नव निर्वाचित तालुका अध्यक्ष कोण होणार ? ह्या कडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे
शहरात मागील अनेक दिवसापासून भाजपा तालुकाध्यक्षाच्या निवडीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे कारण येथील माजी बजरंग दल तालुका संयोजक गजानन चायल हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रगण्य समजणारा चेहरा म्हणून हिमायतनगर तालुक्या सह मतदार संघात त्यांची वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष होण्यासाठी त्यांनी ह्या वेळेस पक्षश्रेष्ठीकडे आपले मत मांडले आहे त्यामुळे हिमायतनगर शहरासह तालुक्यात भाजपाचे मोठे संघठण यांच्या पाठीशी येणार आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील भाजपा येथील तालुकाध्यक्ष निवड प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत असल्याची जोरदार चर्चा शहरात रंगत आहे जर का गजानन चायल हे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष झाले तर हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये चांगलेच भाजपाचे वारे वाहणार असल्याची चर्चा हिमायतनगर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचबरोबर पक्षाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन भाऊ तुप्तेवार हे सुद्धा सामाजिक क्षेत्रांमध्ये अग्रगण्य समजले जातात त्यांच बरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सुधाकर पाटील सोनारीकर हे सुद्धा तालुका अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेमध्ये त्यांचे नाव चर्चेत आहे व सध्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आशिष भाऊ सकवांण यांनी सुद्धा यांच्या फेरनिवडीची मागणी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा पक्ष निरीक्षक व जिल्हाअध्यक्ष सुधाकर पाटील भोयर हे हिमायतनगर येथील तालुका अध्यक्ष निवडीसाठी कोणता चेहरा देणार याकडे मात्र हिमायतनगर शहरासह तालुक्याचे लक्ष लागले आहे