प्रतिनिधी/हिमायतनगर : तालुक्यातील मौजे मंगरुळ येथे लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाचे आयोजन गावकर्यांच्या वतीने करण्यात आले होते. सकाळी आण्णाभाऊ साठे यांच्यासह बहुजन महामानवांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन व लाल ध्वजाचे ध्वजारोहन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवर मुख्याध्यापक श्री. खिराडे सर, श्री.सुमेध पोपलवार सर, डॉ. लोखंडे साहेब, सुभाषराव जलवाड, सोसायटी संचालक तथा तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष गुलझरवाड,माधवराव जललवाड, ग्रा. स. बालाजी पावडे, सोसायटी संचालक मारुती सोमनवाड यांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले.
संपूर्ण महिनाभर आपण बघतोय सर्वत्र आण्णाभाऊची जयंती उत्साहात साजरी होत आहे. ती झालीच पाहिजे परंतु फक्त आण्णाभाऊंचा फोटो डोक्यावर घेऊन नाचणे म्हणजे परिवर्तन नव्हे तर यांचे साहित्य सर्वांनी वाचणे गरजेचे आहे. ते समाजाला समतेची शिकवण देणारं आहे. त्यामुळे समाजात खर्या अर्थाने परिवर्तन होण्यास मदत होईल. त्याचबरोबर महापुरुषांना जातीच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु जाती धर्माच्या सिमारेषा ओलांडुन त्या महापुरुषांनी काम केलं आहे म्हणुनच तर ते राष्ट्रपुरुष झाले आहेत. असे उद्गार मा.संतोषराव आंबेकर, तालुकाध्यक्ष,काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभाग, सोसायटी संचालक तथा उपसरपंच,मंगरुळ यांनी समाजाला मार्गदर्शन करताना काढले.
यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
या जयंती कार्यक्रमास नामदेव कुंजरवाड, राजाराम कोरटवाड, डॉ वाढोरे, माधव जयस्वाल, लिंगोजी आंबेकर श्रीराम आंबेकर प्रकाश आंबेकर दत्ता आंबेकर चंद्रकांत गवळी दिगंबर आंबेकर शिवाजी आंबेकर शामराव आंबेकर अंकुश आंबेकर करण आंबेकर प्रवीण आंबेकर रामराव पाटील पांडुरंग मेटेवार ,
आदींसह गावातील नागरीक, समाज बांधव,महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. #सत्यप्रभा न्यूज # नांदेड