नांदेड दि.27 ऑगस्ट रोजी दत्तात्रय अनंतवार यांचा वाढदिवस
माहिती अधिकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले त्यामुळे त्यांची ओळख म्हणजे आर.टी. आय कार्यकर्ते म्हणून संबंध महाराष्ट्र भर त्याची ख्याती आहे समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सोबत सुमारे पंधरा वर्ष काम करून 2005 साली माहितीचा अधिकार हा कायदा शासनाकडून पारित झाल्यानंतर त्याचा पुरेपुर उपयोग घेऊन महाराष्ट्र भर आपल्या कार्याची चुणूक दाखवून माहिती अधिकार तपास समिती ची स्थापना करून समितीच्या मार्फत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आणून450 च्या वर भ्रष्ट शासकीय अधिकारी,कर्मचारी, यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जेल ची हवा दाखवणारे व भ्रष्ट अधिकाऱ्यांचा कर्दनकाळ म्हणून ओळख निर्माण करणारे आणि माहिती अधिकार तपास समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.दत्तात्रय पांडुरंग अनंतवार यांनी अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने शासनाने याची गंबिर दखल घेत त्यांना शासनाकडून तब्बल अकरा वर्ष निःशुल्क सुरक्षा रक्षक प्रदान करण्यात आले होते अशा हुरहुन्नरी, मितभाषी ,कार्यकौशल नेतृत्व अनंतवार यांना सामाजिक क्षेत्रात काम असताना ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचे काही देणं लागते म्हणून दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक क्षेत्रात रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर, अन्नदान हे उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा करत असतात. परंतु यावर्षी त्याही पलीकडे जाऊन आपण ज्या आईच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येक आईचा आदरपूर्व सन्मान झाला पाहिजे म्हणून आज मुदखेड तालुक्यातील आरोग्याचा कणा म्हणून अत्यंत तुटपुंजा मानधनांवर गावागावात काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक ताईंचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मुदखेड तालुक्याचे आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे अधिवेशन असल्याचे दत्तात्रय अनंतवार यांना समजताच मुदखेड तालुक्याच्या प्रत्येक गावातली महिला त्या अधिवेशनात उपस्थित होती प्रत्येक गावातल्या आपल्या महिलांचा सत्कार झाला पाहिजे हे भान ठेवून त्यांनी सर्वच महिलांचा सत्कार, सन्मान केला त्याचबरोबर मुदखेड नगरीचे माजी उपनगराध्यक्ष बालाजी गोडसे माजी नगरसेवक कैलास गोडसे युवा उद्योजक सुमित गोडसे यांनी सुद्धा दत्तात्रय अनंतवार यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान केला तसेच भोकर येथे कलाल समाजातील पदाधिकारी व राजकीय क्षेत्रातील मंडळींनी वाढदिवसानिमित्त दत्तात्रय अनंतवार यांचा सन्मान केला त्याचबरोबर भोकर तालुक्यात पाळज या गावी नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पाळज येथील गणपती मंदिरात दत्तात्रय अनंतवार यांचा गणपती बाप्पांचा फोटो व शाल देऊन मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात आला… या सत्कारा समारंभी सामाजिक कार्यकर्त्या तथा CITU राज्य सचिव कॉ.डॉ.उज्वला पडलवार महाराष्ट्र कलाल गौड युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा टायगर ग्रुप जिल्हा सचिव सुनील अनंतवार ,बाबुराव अंदबोरिकर,नागनाथ कोंडलवार,भोकरचे सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील कोंडलवार.संजय सुधनवार ,पप्पू अण्णा बोलेवार ,राजेश पाटिल कोंडलवार,कार्तिक कोंडलवार
सोमेश कोंडलवार,बालाजी भिमागौड,गंगाधर करंदीकर, व साईसर यांची प्रमुख उपस्थिती होती. #सत्यप्रभा न्यूज # नांदेड