👉🏻 अखंड 24 तास चालणाऱ्या ओम नमः शिवाय जपास भाविकांचा प्रतिसाद..
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी येथील जागरूक देवस्थान म्हणजे श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथील सगुण गुणाचे रूप असलेल्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविक भक्तांनी अलोट गर्दी केली होती शिव शंकरा नामाच्या गजरात सकाळी ५ वाजल्या पासून हिमायतनगर येथील पुरातन कालीन मंदिरात वाढोणा वासीयांचे श्रध्दास्थान असलेल्या शंकररूपी अवतारातील श्री परमेश्वर मूर्तीला पुरोहित कांता गुरु वाळके यांच्या वेदमंत्राच्या वाणीत रात्री अभिषेक सोहळा संपन्न झाला होता त्यानंतर ब्रम्हांडनायक, देवाचे देव मानल्या जाणाऱ्या शंकराच्या दर्शनासाठी पहिल्या श्रावणी सोमवारी हजारो महिला- पुरुष भक्तांनी मोठी गर्दी केली होती
श्रावण मासाची सुरवात दि.१७ ऑगस्ट पासुन झाली आहे असल्याने आज श्रवणातील पहील्या सोमवारी येथील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथील महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भावीकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. विदर्भ -मराठवाडयाच्या सिमेवर असलेल्या हिमायतनगर(वाढेणा) शहरवासीयांचे श्रध्दास्थान श्री परमेश्वराचे मंदीर आहे या मंदीरातील भुयारात 400 वर्षापुर्वीची श्री परमेश्वराची उभी मुर्ती असुन, विष्णुच्या दहा अवतारा पैकी एक अवतार आहे. भारतात कुठेही श्री परमेश्वरची मुर्ती नसल्याने येथील वाढोण्याच्या ग्राम दैवत श्री परमेश्वर महाराजांच्या दर्शनाला विदर्भ, आंध्रपदेश, तेलंगणा सह दुरदुरहुन भावीक भक्तांनी महाशीवरात्री, श्रावण मासात येथे अवर्जुन हजेरी लावतात या मंदीराचे बांधकाम हेमाडपंथी असुन, प्रत्येक सोमवार येथे महाआरती केली जाते. आरती व दर्शनासाठी सायंकाळी शिवभकतांची मंदीयाळी होते. वर्षभर भावीक पुजा, अर्चना, महाअभीषेक व लग्न वीधीही या ठीकाणी करतात. मंदीर परीसरात पिंपळ, वड, असे वृक्ष आहेत श्रावणात मंदिर समीती कडून दर वर्षी शिवमहापुरान कथासार धार्मिक प्रबोधनपर कार्यकम सुरू असतात या कथा श्रवणासाठी दूर दूर वरून भाविक भक्तांची मोठी गर्दी होत आहे असे मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्री श्रीमाळ यांनी सांगितले
त्याचबरोबर पिंपळगाव येथील परमपूज्य बाल योगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या संकल्पनेतून अखंड 24 तास एक महिना श्री परमेश्वर मंदिर येथे ओम नमः शिवाय च्या जपा सुरवात केली आहे त्या जपास सुद्धा येथील भावी भक्तांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे यावेळी मंदिर कमिटीचे विश्वस्त संजय माने,विलास वानखेडे, गजनान चायल, मयबा होळकर ,रामभाऊ सूर्यवंशी, पंडीत ढोणे,सह असंख्य जन मंदिर परिसराच्या देखरेखी साठी परिश्रम घेत आहेत