हदगाव दि.१९: हदगाव तालुक्यातील धानोरा ते हदगाव वाळकी बाजार मार्ग बंद झालेली बस सेवा तात्काळ सुरू करून या गावातील विद्यार्थ्यांची गैरसोय, हेळसांड तात्काळ दूर करावी अशी आग्रही मागणी राज्य परिवहन महामंडळाचे नांदेड विभागीय नियंत्रक कमलेश भारती यांच्याकडे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य भागवत देवसरकर यांनी केली आहे.
धानोरा,टाकला,वाळकी बाजार दगडवाडी येथून दररोज शेकडो विद्यार्थी,विद्यार्थिनी हदगाव येथे शाळा कॉलेजमध्ये शिकण्यासाठी ये जा करत आहेत, वाळकी बाजारपर्यंत पायी जाऊन बसचा प्रवास करावा लागत आहे,त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक महिलाना सुद्धा बस बंद असल्यामुळे मोठा फटका बसत आहे,ही गैरसोय दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हदगाव आगार मार्फत धानोरा ते हदगाव सकाळी 9 वाजता व हदगाव ते धानोरा सायंकाळी 4.30 वाजता बस सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे,बस सेवा तात्काळ सुरू करून या भागातील नागरिक, महिला व शालेय,कॉलेज विद्यार्थ्यांची गैरसोय, हेळसांड दूर करावी अशी आग्रही मागणी केली आहे,निवेदनाची दखल घेत विभागीय नियंत्रकांनी हदगाव आगार मार्फत धानोरा ते हदगाव बस सेवा लवकरच सुरू करू असे आश्वासन दिले असल्याचेही भागवत देवसरकर यांनी सांगितले आहे,यावेळी धानोरा उपसरपंच देवानंद पाटील वानखेडे, संजय वारकड, नितीन वानखेडे, शेषराव पाटील वानखेडे, माजी सरपंच परमेश्वर बुधेवाड, पंजाबराव कोल्हे,साईनाथ वानखेडे,गणेश कदम,मिलिंद वानखेडे,युवा सेनेचे संतोष पिसाळ,अंकुश शिंदे,गजानन माने,सदानंद जाधव,सत्यम पाटील, भगवानराव कल्याणकर,संतोष मिटकरे,विठ्ठल वानखेडे,प्रकाश वानखेडे,दादाराव बलखंडे,बालाजी भालेराव आदी उपस्थित होते. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड