हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरा सह तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमायतनगर शहरात ठीक ठिकाणी मटका खुलेआम चालत असल्याचे vedio सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले आहे या अवैध मटका व जुगार चालवणार्याला कारणीभुत कोण ? अस प्रश्न शहरातील कष्ठकरी महिला व तरुण वर्गातुन होत आहे.
![](https://www.satyaprabhanews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230816-WA0043-837x1024.jpg)
शहरात ठीक ठिकाणी राज रोस पने जुगार व मटका अड्डे सुरू आहेत ह्याला स्थानिक पोलिसाचे अभय असल्याचे शहरात बोलल्या जात आहे काही ठराविक मटका घेणार्या नौकरावर वरिष्ठांचा दबाव आल्याने तात्पुरती कारवाई करुन पोलिस प्रशासन मोकळे होत असल्याचे शहरात नेहमी बोलल्या जात आहे पण गब्बर मटका किंग वर अद्याप कारवाई झाली नसल्याने येथील पोलिस प्रशासनावर शंका व्यक्त केली जात आहे.गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील चौपाटी उमर चौक व पोलीस स्टेशन परिसरासह इतर ठिकाणी मटका चालत असुन यावर लगाम लाण्यास असमर्थ असलेल्या हिमायतनगर पोलिस ठाण्यामुळेच मटका जुगार फोपावला असल्याची ओरड नागरिक मधून होत आहे.गावातील तसेच परिसरातील गाव तांड्या – वस्तीतील गरीब कष्ठकरी महिला मजुर शेतात राब राब राबवून आलेला पैसा बाजारासाठी तसेच घरउपयोगी लागणार्या साहित्यासाठी जमा करत आपल्या कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी कष्ठाने कमवलेली तूटपुंजी हे जमा करुण ठेवतात परंतु नशेच्या आहारी गेलेला नवरा मटका व जुगार खेळण्यासाठी ऐण मजुरी मिळण्याच्या दिवशी महणजे बुधवारी घरी येऊन पत्नीला मारहाण करून आलेली मजुरी पुर्ण घेऊन मटका खेळण्यासाठी शहरात एका दुकाना प्रमाणे थाटलेल्या शहरातील मटका काॅऊन्टरवर जावून मटक्याची आकडेवारी करीत मटका लावतात. व शेवटी पैसा संपला कि दारु पिऊन घरी जाऊन घरातील मुला बाळा सह आपल्या पत्नीला मारहाण करतात.ह्या घडत असलेल्या प्रकाराकडे तात्काळ आळा घालणे गरजेचे झाले आहे असे म्हणत एका नवं तरुण युवकाने फेसबुक वर लाईव्ह करून मटका बुकिंग चा व्हिडिओ व्हायरल केला आहे
शहरातील चौपाटी उमर चौक बस स्टँड सह पोलीस स्टेशन परिसरातील मटका घेणार्याचे मनोबळ दिवसेन दिवस वाढतच चालले असल्यामुळे अनेकांची घरे उध्दस्त झाली असून अनेकांनी कर्जा पोटी अत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.राजरोश घेण्यात येत असलेला मटका बंद न झाल्यास गरीब कुटुंबातील महिला वैतागुन घरसोडुन जाण्याच्या मानसीकतेत आहे तर काही शाळकरी विध्यार्थी,नवतरुण मंडळी हे व्यसनात अमाप पैसा खर्च करत असून सार्वजनिक असलेल्या ठिकाणी मौज मजा मारत असल्याने सज्जनाचे जगने हराम होवून दुर्जनांची दिवाळी व सुड प्रवूत्तीची होळी अशी दुरावस्था पहावयास मिळत आहे.म्हणुनच गाव मटकामुक्त करण्यासाठी व अवैध धंदे गावातून हाकलून लावल्या गेले तरच गावासह व संपूर्ण तालुक्यातिल गावे अवैध धंद्या पासुन मुक्त होवु शकते.याकडे वरिष्ठ पोलीस अधीक्षक साहेब सह L.C.B. च्या यंञणेने सुध्दा लक्ष देवून दखल घेणे गरजेचे असल्याचे शहरातील जाणकार नागरिकांकडून बोलल्या जात आहे.