हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय येथे आज दि 13 ऑगस्ट रोज रविवारी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या शिबिराचे उद्घाटन मा.ना.संजयभाऊ राठोड मृद व जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले
![](https://www.satyaprabhanews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230813_180102-1024x568.jpg)
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील ,नांदेड विधानसभेचे आमदार बालाजी कल्याणकर सह आदी जन होते यावेळी मंत्री संजय राठोड यांनी असे सांगितले की बाबुराव जी जिल्हाप्रमुख होते तेव्हा पासून आम्ही त्यांना ओळखतो पण राजकारणात बरेच जण वेळ पाहून अंग काढून घेतात पण बाबुराव साहेब सर्व सामान्य नागरिकांच्या वेळोवेळी मदत करत राहतात जो नागरिक त्यांच्या कडे काम घेऊन येतो त्यांचे समाधान झाल्या शिवाय बाबुराव साहेब गप्प बसत नाहीत हे त्यांचा स्वभाव आहे अगोदर पासूनच बाबुराव साहेबाना आरोग्य सेवा करण्याची आवड आहे महणुन ते या भागात लोकसेवक महनुन ओळखले जातात असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले त्यानंतर येथील प्रसिद्ध असलेले श्री परमेश्वर मंदिर देवस्थान चे त्यांनी दर्शन घेतले यावेळी मंदिर कमिटी कडून त्यांचा स्तकार करण्यात आला त्यानंतर उपस्थित आरोग्य शिबिराला आलेल्या रुग्णाच्या अस्थपनाची मंत्री संजय राठोड व खासदार हेमंत पाटील यांनी चौकशी करून त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या…
![](https://www.satyaprabhanews.com/wp-content/uploads/2023/08/IMG20230813115041-1024x768.jpg)
यावेळी लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर, जिल्हाप्रमुख आनंद बोंडारे,शिवसैनिक श्याम वानखेडे, उमेश मुंडे, जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, युवा सेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसनकर, महिला युवती सेना जिल्हाप्रमुख शितलताई भांगे, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे ,भाजपा तालुका अध्यक्ष आशिष सकवान,वळसे पाटील, माजी बांधकाम सभापती प्रताप देशमुख, राजू पाटील सिल्लोडेकर, गजानन हारडपकर,दिनेश राठोड,बाळा पतंगे,सह आदी शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते